IMPIMP

Maharashtra Political Crisis | पक्षाच्या चिन्हाबाबत शिवसेनेला तुर्तास दिलासा; सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी

by nagesh
Uddhav Thackeray | those raised by the shiv sainiks went into the box thackeray targets shinde group

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेना (Shivsena) कोणाची, याबाबत सुरु असलेल्या वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश (Maharashtra Political Crisis) दिले आहेत. हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे (Constitution Bench) देण्यात आले असून याबाबत आता पुढील सुनावणी गुरुवारी (दि.25) होणार आहे. तसेच जोपर्यंत सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी (Maharashtra Political Crisis) पुढे ढकलली गेली होती.
पण आज शिवसेनेने याबद्दल सर न्यायाधीशांकडे विनंती केली. त्यामुळे अखेरीस सुनावणी घेण्यात आली.
सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना (Chief Justice NV Ramana) यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी शिवसेनेची बाजू ऐकून घेतली. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले असून गुरुवारी घटनापीठासमोर पुढील सुनावणी होणार आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकीपूर्वी प्रतिकात्मक मुद्यावर न्यायालयाची तोपर्यंत स्थगिती दिली आहे.

 

 

दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वादावर 12 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी न्यायालयाने 10 दिवस लांबणीवर टाकली होती.
त्यानुसार 22 ऑगस्ट रोजी ही सुनावणी अपेक्षित होती.
पण त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायमूर्ती उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली होती.
सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या सप्लीमेंट्री लिस्ट Supplementary List (पूरक यादी) मध्ये महाराष्ट्राचे कामकाज आजसाठी समाविष्ट नसल्याने आज ही सुनावणी होणार नसल्याचं बोललं गेलं.
परंतु सकाळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | relief to shivsena dont take any decision court order to election commission shivsena vs cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Early Puberty Signs | तुमचा मुलगा किंवा मुलगी अकाली तरुण होत आहेत का? ‘ही’ लक्षणे दिसताच पालकांनी व्हावे सतर्क

Aadhar Update | आधार बनवण्यासाठी आता होणार नाही दगदग, UIDAI ने केली ही घोषणा

Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे, ‘या’ मुद्यावर होणार निर्णय

 

Related Posts