IMPIMP

Maharashtra Political Crisis | खातेवाटपानंतर दादा भुसे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण; शिंदे गटाचं टेन्शन वाढणार ?

by nagesh
Maharashtra Political Crisis | shiv sena rebel mla and minister in shinde bjp govt dada bhuse unwilling after cabinet allocation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवस मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. अखेर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Political Crisis) झाला मात्र मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले नसल्याने विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर (State Government) निशाणा साधण्यास सुरुवात केली. अखेर रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपात अनेक धक्कादायक बदल दिसून आल्याचे बोलले जात आहे. यानंतर शिंदे गटात (Shinde Group) नाराजी वाढल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या अनपेक्षित बदलानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) नाराज असल्याची चर्चा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) करुन शिंदे गटात गेलेल्या काही मंत्र्यांची मात्र निराशा झाल्याचे दिसत आहे. दादा भुसे हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) कृषीमंत्री (Agriculture Minister) होते. परंतु शिंदे सरकारमध्ये भुसे यांच्यावर बंदरे व खनिज खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भुसे यांच्याकडे आधीच्या तुलनेत दुय्यम खाते दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे दादा भुसे नाराज (Maharashtra Political Crisis) असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आगामी काळात नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

 

शिदे गट आणि भाजपकडे कोणती खाती ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते (Urban Development) कायम ठेवले आहे.
तर गृह आणि अर्थ ही सर्वात महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: कडे ठेवली आहेत.
आधीच्या ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Government) शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे (Shinde Group) कायम ठेवण्यात आली आहेत.
तर राष्ट्रवादीकडे (NCP) असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपच्या वाट्याला गेली आहे.

शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ),
पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.
भाजपकडे गृह, अर्थ, महसूल, ऊर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपच्या दिग्गज नेत्यांना धक्का

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
या दिग्गज भाजप (BJP) नेत्यांना धक्का देण्यात आला आहे. काहींना अनपेक्षितपणे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहिर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते.
या खातेवाटपावर फडणवीस यांचाच वरचष्मा दिसून आला आहे.

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | shiv sena rebel mla and minister in shinde bjp govt dada bhuse unwilling after cabinet allocation

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन मोटारसायकल नेली चोरुन

Independence Day 2022 | नरेंद्र मोदींचा नवा नारा – ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’

Mukesh Ambani | 3 तासांत खात्मा करणार… मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; फोन कॉलमुळे प्रचंड खळबळ

 

Related Posts