IMPIMP

Mukesh Ambani | 3 तासांत खात्मा करणार… मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; फोन कॉलमुळे प्रचंड खळबळ

by nagesh
Mukesh Ambani | death threat to mukesh ambani and his family

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance Industries Group) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने 4-5 वेळेस धमकी दिल्याचे समोर आले आहे. अँटिलिया प्रकरणानंतर (Antilia Case) दुसऱ्यांदा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकी आल्यामुळे पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. या फोन कॉलमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी आज सकाळी देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करताना दिसून आले होते. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यानंतर एक मोठी बातमी समोर आली. अंबानी कुटुंबियांना (Ambani Family) जीवे मारण्याची धमकीचे कॉल आले. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या (Reliance Foundation Hospital) फोन नंबरवर 4-5 वेळा धमकी देणारा फोन केला होता. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने डीबी मार्ग पोलीस ठाण्यात (DB Marg Police Station) माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असावी. पोलीस लवकरच या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करु शकते. पोलिसांकडून अंबानी कुटुंबीयांची सुरक्षा वाढवली जाऊ शकते असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

 

रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालायाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी (CEO Dr. Tarang Gnanchandani) यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, आम्हाला आठ फोन कॉल आले होते.
आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी (Terrorist) असू शकतात असेही त्यांनी म्हटले.
फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – Mukesh Ambani | death threat to mukesh ambani and his family

 

हे देखील वाचा :

Independence Day 2022 | नरेंद्र मोदींचा नवा नारा – ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’

Rakesh Jhunjhunwala यांची भविष्यवाणी खरी ठरली; 3 ’एम’ बद्दल कोणीही अचूक भाकीत करू शकत नाही

Pune ACB Trap | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 हजाराची लाच घेताना कोथरूड एसीपी ऑफिसमधील पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 

Related Posts