IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना दिलासा, अपात्र आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला

by nagesh
Maharashtra Political Crisis | supreme court constitutional bench verdict on maharashtra politics uddhav thackeray vs eknath shinde

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे या आमदारांचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे. तर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी हा निकाल वाचून दाखवला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शहा (Justice MR Shah), न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Justice Krishna Murari), न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Hima Kohli), न्यायमूर्ती पी एस नरसिंहा (Justice PS Narasimha) यांचा समावेश आहे. (Maharashtra Political Crisis)

 

 

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

– भरत गोगावले (Bharat Gogawale) प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर, अधिकृत व्हिप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात कोर्टाचे निरीक्षण
– अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत, हा बचाव होऊ शकत नाही
– सरकारवर शंका घेण्याचे कारण राज्यपालांकडे नव्हतं. बहुमत चाचणी बोलवण्याची गरज नव्हती. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर नको.
– उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता.

 

 

सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना दिलासा

– प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य
– गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर
– फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही.

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court constitutional bench verdict on maharashtra politics uddhav thackeray vs eknath shinde

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला धक्का, गोगावलेंची प्रतोद पदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

 

Related Posts