IMPIMP

Maharashtra Political News | ‘काही तरी शिजतंय… महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार’, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

by nagesh
Ajit Pawar | ajit pawars reaction on sharad pawars statement

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Political News | राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत सुरु असलेल्या
उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र तरीही चर्चा थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार माजी
मंत्री प्रकाश सोळंके (MLA Former Minister Prakash Solanke) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रात लवकरच राजकीय
(Maharashtra Political News) भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारच असं खळबळजनक वक्तव्य सोळंके यांनी
केले आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव यावरुन हे सांगत आहे असंही प्रकाश साळुंके यांनी म्हटले आहे. माजलगाव येथे पत्रकार परिषदेत
ते बोलत होते.

 

प्रकाश सोळंके पुढे म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीच्या आधी भाजप (BJP) महाराष्ट्रात काहीतरी चमत्कार करेल. त्यामुळे अजित दादांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही (Maharashtra Political News) काहीतरी शिजत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा उलट सुटल चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पत्रकार परिषदेत बोलताना सोळुंके म्हणाले, सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे, असं होणार तसं होणार, ते बोलणारा थांग पत्ता लागून देत नाही, ते काय होणार? पण होणारच आहे. जे व्हायचं ते होणारच आहे. महाराष्ट्रात जी चर्चा आहे ते होणारचं आहे, त्यांच्याबद्दल कुणी मनात शंका आणू नये.

 

ते पुढे म्हणाले, राजकारणातील घडामोडीचे काय व्हायचंय ते होवो, मी गेल्या 15 दिवसांपासून मुंबईला गेलो नाही, माझी कोणाशी चर्चा झाली नाही. मात्र 35 वर्षाच्या राजकारणानंतर, राजकारणाचं काय होणं अपेक्षित आहे? याची जाण मला आहे. म्हणून मी स्टेटमेंट दिलं. परंतु नश्चितच काहीना काही भूकंप नक्कीच होण्याची परिस्थिती आहे. दुर्दैवााने राज्यात आज अशी परिस्थिती निर्माण झालीय, स्थिर राज्य आणि पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला असा काहीना काही चमत्कार राज्यात करावा लागणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Maharashtra Political News | ncp former minister on ajit pawar and ncp political developement

 

हे देखील वाचा :

Arcelor Mittal Nippon Steel India (AM/NS India) | अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : वाकड पोलिस स्टेशन – काळेवाडीत 14 वर्षीय मुलीचा खोलीत कोंडून कपडे फाडून विनयभंग, ‘प्रिन्स’ला अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – कारवाईच्या भितीने 21 वर्षीय तरूणीची लॉजमध्ये गळफास घेवुन आत्महत्या, हडपसरमधील तरूणाविरूध्द गुन्हा

 

Related Posts