IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : वाकड पोलिस स्टेशन – काळेवाडीत 14 वर्षीय मुलीचा खोलीत कोंडून कपडे फाडून विनयभंग, ‘प्रिन्स’ला अटक

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime News | Wakad Police Station - Kalewadi 14-year-old girl locked in room and  molested by tearing her clothes, 'Prince' arrested

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वाकड पोलिस स्टेशनच्या (Wakad Police Station) हद्दीतील
काळेवाडीमध्ये (Kalewadi) एका 14 वर्षीय मुलीला खोलीत कोंडून तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग (Molestation Case) करणार्‍या नराधमास
वाकड पोलिसांनी अटक केली आहे (Crime Against Woman). ही घटना गुरूवारी सकाळी दहा वाजता घडली असून नराधमाविरूध्द वाकड पोलिस
स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रिन्सकुमार विजय ठाकुर Prince Kumar Vijay Thakur (21, रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 14 वर्षीय पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी प्रिन्सकुमार हा पिडीत मुलीला जाता-येता अडवुन मला भेटायला ये असे म्हणत होता. पिडीत मुलीने त्यास नकार दिला. त्यावेळी प्रिन्सकुमारने तिचा हात पकडुन तु जर मला भेटायला आली नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

दि. 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी ही घराच्या पाठीमागे असलेल्या बाथरूममध्ये गेली असता आरोपी प्रिन्सकुमार हा आधीपासुनच तिथे होता. प्रिन्सकुमारला पाहून पिडीत मुलीने आरडाओरडा केला. त्यावेळी त्याने तिचे तोंड दाबुन तिला मिठी मारली आणि तु जर कोणाला काही सांगितले तर तर मारून टाकेल अशी धमकी दिली. दि. 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता आरोपी हा पिडीत मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने घराची आतुन कडी लावली आणि लाईट बंद केली. पिडीत मुलीला मिठी मारून त्याने तिच्या अंगावरील कपडे फाडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला आणि घराची बाहेरून कडी लावुन निघून गेला.

 

वाकड पोलिसांकडे पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रिन्सकुमार ठाकुरला अटक केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोडे (PSI Gode) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Wakad Police Station – Kalewadi 14-year-old girl locked in room and  molested by tearing her clothes, ‘Prince’ arrested

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – कारवाईच्या भितीने 21 वर्षीय तरूणीची लॉजमध्ये गळफास घेवुन आत्महत्या, हडपसरमधील तरूणाविरूध्द गुन्हा

ACB Trap On PSI And Police Havaldar | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : रेप केस दाखल करण्याची धमकी देत 40 हजाराच्या लाचेची मागणी; पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

MP Supriya Sule | ‘त्या’ प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, म्हणाल्या…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – फोटो पतीला दाखविण्याची, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

 

Related Posts