IMPIMP

Maharashtra Politics | उध्दव ठाकरे आमच्या निवेदनाची साधी दखलही घेत नव्हते; जोगेंद्र कवाडेंची टिका

काँग्रेसचा 'हात' सोडून शिंदे गटाबरोबर युती

by nagesh
Maharashtra Politics | jogendra kawade make a alliance with eknath shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे हे आमच्या निवेदनाची साधी दखलही घेत नव्हते”, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी केली. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर केली आहे. त्यावेळी कवाडे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला. ते म्हणाले की, नागपूर मधील अंबाझरी उद्यानाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर चार कोटी रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक भवन उभारले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही वीस एकरची जागा पर्यटन विभागाला देण्यात आली. तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या जागेवर बुलडोजर फिरवला.

 

 

हे होत असताना आम्ही सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना भेटलो, आमचे म्हणणे मांडले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चार वेळा निवेदन दिले. आदित्य ठाकरेंचीही भेट घेऊन निवेदन दिले. पण आमच्या निवेदनाची साधी दखलही त्यांनी घेतली नाही. पण शिंदे सरकारकडे आम्ही ही मागणी मांडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी भूमिका जोगेंद्र कवाडे यांनी मांडली. तसेच “एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आले. तळागळातून संघर्ष करत वर येणारे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या प्रमुखपदी बसले आहेत. अशी स्तुती सुमने देखील उधळली. (Maharashtra Politics)

 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत
जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचे आम्ही स्वागत करतो. जोगेंद्र कवाडे यांनी संघर्षाच्या काळात चळवळीत खूप मोठे योगदान दिलेले आहे.
चळवळीसाठी त्यांनी सहा महिने तुरुंगवासही भोगला.
कवाडे यांची आक्रमकता भल्याभल्यांना घाम फोडणारी होती.
जोगेंद्र कवाडे यांचा लाँग मार्च आता योग्य ठिकाणी पोहोचला आहे”,
अशी मिश्किल टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | jogendra kawade make a alliance with eknath shinde group

 

हे देखील वाचा :

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Anil Parab | अनिल परबांना ईडीचा दणका; 10 कोटींची मालमत्ता जप्त

Ajit Pawar | मी कोणतंही वादग्रस्त विधान केलं नाही;‘स्वराज्यरक्षक’ या भूमिकेवर ठाम – अजित पवार

 

Related Posts