IMPIMP

Anil Parab | अनिल परबांना ईडीचा दणका; 10 कोटींची मालमत्ता जप्त

by nagesh
Anil Parab | shivsena leader anil parab ed seize property worth 10 crores of sai resort

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Anil Parab | साई रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ईडीने शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांची 10 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईमुळे परबांना मोठा धक्का मानला जात आहे.

 

पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब, मेसर्स साई रिसॉर्ट, मेसर्स सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध माननीय न्यायदंडाधिकारी, दापोली यांच्यासमोर दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 च्या कलम 19 आणि कलम 15 r/w कलम 7 चे उल्लंघन. दापोली पोलीस स्टेशनमध्ये परब (Anil Parab) यांच्या विरूद्ध एक एफआयआर देखील नोंदवली होती. त्यानुसार ही कारवाई केली आहे. ईडीने साई रिसॉर्ट NX आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात 10.20 कोटी रूपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. संलग्न मालमत्ता जमिनीच्या स्वरूपात (अंदाजे ४२ गुंठा मोजून) गट क्रमांक ४४६, मुरूड, दापोली, रत्नागिरी येथे आहे, ज्याची किंमत २,७३,९१,००० रूपये आहे आणि साई रिसॉर्ट एनएक्स या रिसॉर्टवर बांधण्यात आले आहे. 7,46,47,000 रूपये किंमतीची जमीन आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

साई रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
साई रिसॉर्ट हे बेकादयेशीर आहे.
तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हे रिसॉर्ट पाडण्यासंबंधी एक जाहिरात देखील वृत्तपत्रात छापून आली होती. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हे रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते.

 

Web Title :- Anil Parab | shivsena leader anil parab ed seize property worth 10 crores of sai resort

 

हे देखील वाचा :

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा

Related Posts