IMPIMP

Maharashtra Politics News | ‘हपापलेपणा कोण करतंय?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ ट्विटवर ठाकरे गटाचा पलटवार

by nagesh
Maharashtra Politics News | sushma andhare replied to cm eknath shinde tweet on uddhav and aditya thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | काही लोक केवळ कुटुंबापुरता विचार करुन आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरतात, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केली होती. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर (Maharashtra Politics News) दिले आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुषमा अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्री हे स्वत:ला सर्वसाधारण असल्याचं म्हणतात. पण सर्वसाधारण शेतकऱ्याच्या शेतात हेलिकॉप्टर (Helicopter) उतरत नाही. ज्या गावात जायला साधे रस्ते नाहीत, त्या गावात मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन हेलिपॅड (Helipad) आहेत. यावर आधी मुख्यमंत्र्यांनी बोलावं.

 

अंधारे पुढे म्हणाल्या, दुसऱ्यांना हपापलेली माणसं म्हणताना मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावं की भरत गोगावलेंचे (Bharat Gogavle) चिरंजीव, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि रामदास कदमांचे (Ramdas Kadam) चिरंजीव हे राजकारणात आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी शिवसेना (Shivsena) ताब्यात घेतल्यानंतर 40 पैकी 15 आमदारांच्या कुटुंबियांना युवासेना आणि इतर पदांवर नियुक्त (Maharashtra Politics News) केलं आहे. माग कुटुंबासाठी हपापलेपणा कोण करत आहे, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असेही अंधारे म्हणाल्या.

 

 

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, अशी टीका एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.

 

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Politics News | sushma andhare replied to cm eknath shinde tweet on uddhav and aditya thackeray

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘शिंदे सरकारचं भाजपला ओझं झालं’, राऊतांच्या टीकेला भाजप आमदारांचं प्रत्युत्तर

BARTI Pune – Social Welfare | ‘सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत कार्यशाळेत कायद्यांविषयी जनजागृती

SPPU News – International Dance Day | 29 एप्रिल 2023 : आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस – विद्यार्थी, कलासक्तांचा एक खुला रंगमंच ‘ अंगणमंच ‘..!

 

Related Posts