IMPIMP

Pune Crime | बोपदेव घाट परिसरात लुटमार करणारा सराईत गुन्हेगार स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 85 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | बोपदेव घाट (Bopdev Ghat) परिसरात लुटमार करुन दहशत माजविणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील सराईत गुन्हेगार सनी भरत जाधव याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 85 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार सनी भरत जाधव Sunny Bharat Jadhav (वय-22 रा. खंडोबानगर, सासवड, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहे.आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये मुंबई मध्यवर्ती कारागृहात (Mumbai Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

सनी जाधव हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह सासवड
(Saswad Police Station) आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, तलवार या सारख्या हत्यारांह फिरताना दरोडा (Robbery), मृत्यू किंवा जबरी दुखापत, जबरी चोरी, खंडणी (Extortion), दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मागील 5 वर्षात 7 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत.
आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या भागातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सनी जाधव
याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे
(Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Innkeeper who looted in Bopdev Ghat area nabbed, CP Amitabh Gupta takes action against 85 people under MPDA Act Till Date

 

हे देखील वाचा :

Delhi Crime | ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियसीचे केले 35 तुकडे; वसईच्या श्रद्धा वालकरचे खून प्रकरण

Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन

 

Related Posts