IMPIMP

Maharashtra Politics | अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानावरुन राजकीय वातावरण तापलं, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; केली ‘ही’ मागणी

by nagesh
Maharashtra Politics | the state government is anti women jayant patal criticizes shinde fadnavis government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन    Maharashtra Politics | राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यातील राजीकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे. आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन सत्तार यांना मंत्रिमंडळातून (Cabinet) बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांनी चुकीच्या शब्दात वक्तव्य करुन आपले स्तर जाहीर केले आहेत. महाराष्ट्रभर आज त्यांचा निषेध केला जात आहे. त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे यासाठी आम्ही आज राज्यपाल यांना विनंती केली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

 

 

जयंत पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. राज्याच्या
(Maharashtra Politics) संस्कृतीला छेद देण्याचे काम सुरु आहे. लोकसभेत धडाडीने काम करणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी ही घटना घडली आहे, त्यामुळे आता आम्ही राज्यभर निषेध व्यक्त करणार आहे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे महिलांविरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच सत्तार यांना बडतर्फ करण्याची मागणी आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे. जबाबदार व्यक्तीने बोलताना भान ठेवले पाहिजे. राज्यपाल आता याविरोधात कारवाई करतील, असंही जयंत पाटील म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न
विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील
खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार
यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | the state government is anti women jayant patal criticizes shinde fadnavis government

 

हे देखील वाचा :

Har Har Mahadev | ठाण्यात घडलेला प्रकार लांच्छनास्पद, महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागा…; ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजित देशपांडेंची स्पष्ट भूमिका

Pune Crime | वारजे माळवाडीत स्पाच्या नावावर वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेची ‘रेड’

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला राष्ट्रवादीचा विरोध, प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर FIR

 

Related Posts