IMPIMP

Har Har Mahadev | ठाण्यात घडलेला प्रकार लांच्छनास्पद, महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागा…; ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजित देशपांडेंची स्पष्ट भूमिका

by nagesh
Har Har Mahadev | har har mahadev movie director abhijit deshpande on controversy of movie and ncp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्यात ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) केलेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना मारहाण केली. हा प्रकार अत्यंत लांच्छनास्पद आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी, असे देशपांडे यांनी म्हटले.

 

अभिजित देशपांडे म्हणाले, आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून (Censor Board) प्रमाणपत्र मिळाले आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्तऐवज आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे पुरविले आहेत. त्यानंतरच चित्रपटाला मान्यता दिली गेली आहे. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. ऐतिहासिक चित्रपटासंदर्भात सेन्सॉर बोर्डाच्या पॅनेलवर इतिहासकारही असतात. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाण्यातील मॉलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चित्रपटाचा शो बंद करण्यात आला होता.
यावर बोलताना देशपांडे म्हणाले, चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना (Marathi Audience) चित्रपटगृहात जाऊन
मारहाण केली. त्यांचे कपडे फाडले गेले. अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ करण्यात आली.
हा घडलेला प्रकार अत्यंत लांच्छनास्पद आहे. एकीकडे आपण शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj)
स्व:ला भक्त म्हणवतो. तर दुसरीकडे त्यांचेच विचार समजून न घेता शिवीगाळ,
मारहाण करत असू तर आपल्याला हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचा आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली.

 

 

Web Title :-  Har Har Mahadev | har har mahadev movie director abhijit deshpande on controversy of movie and ncp

 

हे देखील वाचा :

India vs England | सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर भारताचा विजय नक्की! ‘हे’ आहे कारण

Pune Crime | वारजे माळवाडीत स्पाच्या नावावर वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेची ‘रेड’

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला राष्ट्रवादीचा विरोध, प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर FIR

 

Related Posts