IMPIMP

Maharashtra Rains | निम्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट, वेगवान वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळणार; 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट

by nagesh
Maharashtra Rains | rain in maharashtra imd predicts light to moderate rains in pune till july 7

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन नैऋत्य मोसमी वारे (Monsoon) देशातून परतून एक महिला उलटला तरी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा (Maharashtra Rains) जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊस (Maharashtra Rains) संपून अल्हाददायक थंडीला (Winter) सुरुवात होत असते. परंतु यंदाच्या वर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी किमान तापमानाचा (Minimum temperature) पारा वाढलेला आहे. तर अरबी समुद्र (Arabian Sea), बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

19 जिल्ह्यांना येलो अलर्ट
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rains) स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.

 

 

पुढील तीन ते चार तासात राज्यात 19 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm and lightning) वेगवान वाऱ्यांच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात आज सकाळ पासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या (Yellow alert) सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शनिवारी राज्यात कमी अधिक प्रमाणात हवामानाची अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उद्या राज्यातील 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली,
कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 10 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
तर मुंबईसह उत्तर कोकण (Konkan), मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार (Maharashtra Rains) आहेत.

 

Web Title :- Maharashtra Rains | heavy rainfall possible in half of maharashtra today imd give alert to 19 districts pune mumbai and others

 

हे देखील वाचा :

Prashant Jagtap | शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात उभारलेल्या ऐतिहासिक लढ्याचा विजय – प्रशांत जगताप

Akshara Singh | ‘मुलं धोकेबाज असतात…’, अभिनेत्री अक्षरा सिंहचा व्हिडीओ व्हायरल

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर बसच्या धडकेत ‘कर्मयोगी’च्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू, विश्वास देवकाते आणि संतोष पवार जखमी

 

Related Posts