IMPIMP

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाची रिपरिप सुरूच; आतापर्यंत 104 जण दगावले, मुंबईला ‘यलो अलर्ट’

by nagesh
Rain in Maharashtra | weather udpate cyclonic status in bay of bengal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Maharashtra Rains Update)
रिपरिप सुरूच आहे. अनेक भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तर अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र दिवसभरात रिमझिम दिसून येत आहे. मुसळधार
पावसाचा फटका शेतींवरही पडला आहे.

 

दोन आठवड्यापासून सततच्या पडणा-या पावसामुळे नदी, नाले, धरणे दुथडी भरून वाहत आहेत. अशातच अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) परिस्थिती भयंकर असून गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rains Update)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईत पावसाची रिपरिप…

मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पातळी आता आवश्यकतेच्या 82 टक्के इतकी आहे, तर तीन तलावही ओसंडून वाहत आहेत. रविवारी मुंबईत फारसा पाऊस झाला नाही. काही भागांत रिमझिम सरी बरसल्या आहेत. मात्र, भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) मुंबई शहरासाठी सोमवारी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. यानुसार आज मुंबईच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains Update | rain in maharashtra 104 people’s dead till date

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘…तर सरकार कोसळेल’ – संजय राऊत

Pune Crime | उरूळी कांचनमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला दौंड तालुक्यात, महिला 8 दिवसांपासून बेपत्ता होती

Maharashtra State Women Commission | पुणे जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 19 ते 21 जुलै दरम्यान जनसुनावणी

 

Related Posts