IMPIMP

Maharashtra Temperature | राज्यात रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता, तापमानात घट

by nagesh
Maharashtra Temperature | temperature at night likely get drop in maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘जवाद’ चक्रीवादळामुळे (Cyclone Jawad) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने (Rain in Maharashtra) झोडपून काढले. वातावरणातील बदलामुळे (Maharashtra Temperature) ऐन थंडीच्या मोसमात थंडी गायब झाली होती. मात्र आता अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असल्याने कोकणासह राज्यात आता सर्वत्र कोरडे हवामान (Maharashtra Temperature) होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

सध्या किमान तापमान (Maharashtra Temperature) सरासरीपेक्षा अधिक असून, अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान सध्या सरासरीच्या तुलनेत घटलेले असले तरी ते दोन दिवसांत पूर्ववत होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र (Low pressure area) आणि चक्राकार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प जमिनकडे आल्याने राज्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत या स्थितीमुळे जोरदार पाऊस (Heavy rain) झाला.

 

मराठवाडा आणि विदर्भात मागील दोन दिवसांपासून हवामान कोरडे आहे. त्यामुळे तेथील रात्रीच्या तापमानात (night temperature) काही प्रमाणात घट होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील ढगाळ वातावरणही एक-दोन दिवसांत दूर होऊन सर्वत्र आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानामुळे मराठवाडा आणि विदर्भात सध्या तापमान सरासरीजवळ आले आहे. परंतु कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ते अद्यापही सरासरीच्या तुलनेत एक ते चार अंशांनी कमी आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमान कमी असल्याने या भागात दिवसा हवेत किंचित गारवा आहे. (Maharashtra Temperature)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अल्हाददायक थंडीची चाहूल?
राज्यात सर्वत्र रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा दोन ते सहा अंशांनी अधिक आहे.
त्यामुळे डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेली रात्रीची थंडी जाणवत नाही.
परंतु येत्या दोन दिवसात तापमान सरासरीजवळ किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यात रात्रीचा गारवा वाढणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Temperature | temperature at night likely get drop in maharashtra

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडेंनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘परमबीर सिंह यांनी प्रकरण संपवण्यासाठी…’

Aadhaar Card | आधार कार्ड हरवले असेल तर पुन्हा कसे मिळवाल, जाणून घ्या सोपी पद्धत

 

Related Posts