IMPIMP

Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | प्रत्येक खातेधारकासाठी मोठी बातमी, बदलले बँकेत पैसे जमा करणे आणि काढण्याचे नियम

by Team Deccan Express
Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | bank rules for cash deposit and withdrawal pan required on cash deposits and withdrawals in bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | पंतप्रधान मोदींनी (PM Modi) सुरू केलेल्या जनधन खाते योजनेअंतर्गत (JanDhan Account) देशातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडण्याचा प्रयत्न केला. आता बँक खात्यातून पैसे काढणे आणि जमा करण्याचे नियम बदलण्यात येणार आहेत (New Bank Rules). अशावेळी सर्व खातेदारांना नवीन नियम माहित असणे आवश्यक आहे. तुमचे कोणत्याही बँकेत खाते असले तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे (Bank Rules For Cash Deposit and Withdrawal).

 

26 मे पासून नवीन नियम लागू

नवीन नियम लागू झाल्यानंतर तुम्ही बँकेत पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी गेल्यास तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने नवीन नियम केले आहेत. 26 मे पासून नवीन नियम लागू होणार आहेत. आता एका आर्थिक वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी आधार किंवा पॅन (PAN) अनिवार्य करण्यात आले आहे.

 

बचत खाते उघडण्यासाठी नियम

याशिवाय बचत खाते उघडण्यासाठी आधार आणि पॅन अनिवार्य करण्यात आले आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, एका आर्थिक वर्षात (Financial Year) बँकांसोबत मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी पॅन माहिती किंवा आधारची बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक असेल.
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्यासाठी हेच नियम लागू असतील.

 

व्यवहारात अधिक पारदर्शकता येऊ शकते

CBDT न प्राप्तीकर (15वी सुधारणा) नियम, 2022 अंतर्गत तयार करण्यात आलेला नवीन नियम 10 मे 2022 रोजी जारी करण्यात आला.
हे नियम 26 मे पासून ग्राहकांसाठी लागू होणार आहेत.
हा नियम लागू झाल्यानंतर व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल आणि काळ्या पैशाला आळा बसेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

 

नियम काय आहे ?

नियमांनुसार, आता जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात खात्यातून 20 लाखांपेक्षा जास्त व्यवहार केले तर पॅन कार्डची माहिती द्यावी लागेल.
जर त्याच्याकडे पॅन नसेल तर तो आधारची बायोमेट्रिक ओळख देऊ शकतो.
त्यामुळे अधिकार्‍यांना व्यवहारांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.

 

Web Title :- Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | bank rules for cash deposit and withdrawal pan required on cash deposits and withdrawals in bank

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts