IMPIMP

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

by nagesh
Marathi Actor Mohan Joshi | actor mohan joshi to play swami samarth maharaj role in sun marathi sant gajanan shegaviche serial

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा (Shree Swami Samarth) महिमा दाखवणारा सिनेमा आजही लोकांच्या लक्षात आहे. तो म्हणजे ‘देऊळ बंद’ (Deool Band) या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आजच्या जगात देखील स्वामींचे अस्तित्व दाखवणारा हा सिनेमा तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहतात. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Marathi Actor Mohan Joshi) यांनी स्वामींची भूमिका साकारली होती. जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर आता पुन्हा एकदा मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Actor Mohan Joshi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोहन जोशींनी (Mohan Joshi) स्वामींच्या भूमिकेला उत्तमरीत्या निभवल्याने प्रेक्षकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले होते. देऊळ बंद सिनेमात आपल्या भक्तांशी ज्याप्रमाणे स्वामी बोलतात ही भूमिका मोहन जोशींनी उत्तमरित्या साकारली होती. तर आता पुन्हा एकदा मोहन जोशी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर हि भूमिका दिसणार आपल्याला देऊळ बंद 2 या सिनेमातून नाही तर सन मराठी (Sun Marathi) वरील ‘संत गजानन शेगावीचा’ (Sant Gajanan Shegavicha) या मालिकेत मोहन जोशी यांची इंट्री होताना दिसणार आहे.

 

 

सन मराठी वरील संत गजानन शेगावीचे ही मालिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडते.
सध्या या मालिकेत महाराजांच्या स्वामी भेटीचा सोहळा संपन्न होणार आहे.
या मालिकेच्या विशेष भागात स्वामींचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.
‘गजानन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणत या मालिकेत स्वामींची एन्ट्री होणार आहे.
मोहन जोशी (Mohan Joshi) पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे कळताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Marathi Actor Mohan Joshi | actor mohan joshi to play swami samarth maharaj role in sun marathi sant gajanan shegaviche serial

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मार्केटयार्ड येथे गोळीबार करुन दरोडा घालणाऱ्या 3 फरार आरोपींना पिस्टलसह अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई

Buldhana Police | दारुच्या नशेत पोलिसाचे पेट्रोलिंग, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 3 वाहनांना धडक; बुलढाण्यातील विचित्र अपघात

Sandipan Bhumre | ‘कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचे अंबादास दानवेंनी येऊन शोधून दाखवावे’ – संदिपान भुमरे

 

Related Posts