IMPIMP

MHADA Exam | म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

by nagesh
Mhada Lottery 2023 | important dates apply process pune mhada lottery 2023 news

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन म्हाडाची परीक्षा (MHADA Exam) रविवारी (दि.12) होणार होती. मात्र पेपर फुटण्याच्या आधिच परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर राज्य सरकारने (State Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे म्हाडा (MHADA Exam) बाहेरच्या संस्था किंवा कंत्राटदारांऐवजी स्वत: परीक्षा घेईल, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांकडून आकारलेले संपूर्ण शुल्क (exam Fee) परत करण्यात येणार आहे. शिवाय पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द केली. पेपर फुटल्याची माहिती देखील म्हाडाला मिळाली होती. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ते नामुष्कीचे ठरलं असतं. याशिवाय अभ्यास केलेल्या परीक्षार्थ्यांवर अन्याय झाला असता, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

पुढील परीक्षा म्हाडा घेणार

रविवारी होणारी म्हाडाची परीक्षा (MHADA Exam) ही अपरीहार्य कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आली होती. खासगी संस्थांच्या माध्यमातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दरम्यान गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढत चालले होते. पेपर फुटल्याची माहिती देखील म्हाडाला मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) कारवाई करत संशयितांना ताब्यात देखील घेतले. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये परिक्षार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या देखील घटना घडल्या होत्या. या सगंळ्या बाबींना रोख बसवण्यासाठी म्हाडाला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला असून या पुढील परीक्षा ही म्हाडा स्वत: घेणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

वशिलेबाजीला फाटा देऊन हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही,
याची दक्षता म्हाडा आणि पोलिसांनी घेतल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
परीक्षा रद्द केल्याबद्दल आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली आहे.

 

Web Title :- MHADA Exam | mhada will conduct exam by itself home jitendra awhad information

 

हे देखील वाचा :

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन

LIC Dhan Rekha Plan | ‘एलआयसी’नं आणला नवीन ‘धन रेखा प्लॅन’ ! जाणून घ्या या मनी बॅक योजनेचे वैशिष्ट्य

 

Related Posts