IMPIMP

MLA Girish Mahajan | ठाकरे शिंदेंच्या भेटीवर गिरीश महाजन म्हणाले -‘ राजकारणात केव्हाही काहीही…’

by nagesh
Girish Mahajan | chhatrapati sambhajinagar mahavikas aghadi bjp girish mahajan maharashtra politics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मनसेच्या (MNS) वतीने शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर दीपोत्सवाचे आयोजन करण्याता आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दीपोत्सवाला भेट दिली. त्यामुळे ठाकरे आणि भाजप-शिंदे सूत जुळत आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर भाजप (BJP) आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्कवरील भेटीकडे राजकारण म्हणून पाहण्याची गरज नाही, असे गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) आणि राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) हा पक्ष, आम्ही एकाच मताचे आहोत. आमचे विचार सारखे आहेत. आमचे ध्येय एकच आहे. त्यामुळे आमच्या भेटीत गैर काही नाही. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मनसेसोबत युतीचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघू नये, असे गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) म्हणाले.

 

शिवसेनेत भूकंप झाल्यावर शिंदे यांचा नवा गट तयार झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
मागील काळात त्यांच्या युतीबाबत (MNS-BJP-Shinde Group Alliance) चर्चा देखील रंगल्या होत्या.
अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by-Election) राज ठाकरेंच्या पत्राने कमाल केली होती.
त्यामुळे ‘राज ठाकरेंचे फडणवीसांना लिहिलेले पत्र’ प्रचंड गाजले.
या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे-फडणवीस जोडीच्या वरवरच्या भेटी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्काला जागा देतात.

 

आगामी काळात मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणुका आहेत.
यावेळी भाजपला (BJP) शिवसेनेला पालिकेतून खेचायचे आहे.
तेव्हा ते ठाकरेंचा पाठिंबा घेणार का? राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकत्र येणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष
लागले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Girish Mahajan | girish mahajan on mns raj thackeray alliance over eknath shinde devendra fadnavis meet raj thackeray

 

हे देखील वाचा :

Cough-Cold And Sore Throat | खोकला-सर्दी आणि घशाच्या खवखवीने आहात त्रस्त तर अवलंबा हमदर्द का जोशीना
Pune News | ‘शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा’ -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

MLA Shahajibapu Patil | मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीवर शहाजीबापू पाटील यांचे भाष्य, म्हणाले – ‘तिन्ही पक्षाचा अजेंडा…’

 

Related Posts