IMPIMP

MLA Nitesh Rane | नितेश राणेंची माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस; मुंबईतील चर्चगेट स्थानकाबाहेर लावले बॅनर

by nagesh
MLA Nitesh Rane | bjp leader and MLA nitesh rane lost chicken reward informant banners mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– MLA Nitesh Rane | शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी आतापर्यंत सहा संशयितांना अटक (Arrested) केली आहे. दरम्यान, गुरुवारी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane), संदेश उर्फ गोट्या सावंत (Sandesh Sawant) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail) पुन्हा एकदा जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे (District Judge S.V. Hande) यांनी फेटाळून लावला आहे. न्यायालयाने राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) गायब झाले असून ते कोठे आहेत हे कोणालाही माहीत नाही. त्यावरून मुंबईत बॅनरबाजी सुरू झाली आहे. चर्चगेट स्थानकाबाहेर हे बॅनर लावण्यात आले आहे. यावर नितेश राणेंचा एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच त्या बॅनरवर नितेश राणे हरवले असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर कोणी लावले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, मुंबईत दिवसभर या बॅनरचीच चर्चा सुरू होती.

 

 

परब यांच्यावर झाला होता हल्ला –

18 डिसेंबरला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचारक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. पुणे येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते सचिन सातपुते (Sachin Satpute) यांनाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तपासाची चक्रे आमदार राणे आणि सावंत यांच्या दिशेने फिरताच दोघांनीही जिल्हा न्यायालयात (District Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मोबाईल हस्तगत करणे गरजेच –

आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना या हल्ला प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे. याची खास चौकशी होणे गरजेची असल्याने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत आहोत असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

Web Title : MLA Nitesh Rane | bjp leader and MLA nitesh rane lost chicken reward informant banners mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Police | धक्कादायक ! पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

Corporator Archana Tushar Patil | प्रभागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरु करा; भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणी

 

Related Posts