IMPIMP

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

by nagesh
Maharashtra TET Exam Scam Case | tukaram supe gets bail in tet scam probe maha tet exam scam case pune cyber police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनटीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. त्यानंतर आता अटकेत असलेल्या निलंबित (Suspended) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे (Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supe) याच्या ड्रायव्हरला (Driver) पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) तुकाराम सुपे यांचा ड्रायव्हर सुनील घोलप (Sunil Gholap) याच्यासह मनोज डोंगरे (Manoj
Dongre) याला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती अधिक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत
आहेत. तुकाराम सुपे याने पाठवलेले विद्यार्थ्यांची नावे (Student Name) आणि हॉल तिकिट (Hall Ticket) अन्य आरोपींना पाठवण्याचे काम सुनील
घोलत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सुनील घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेत (Teacher Eligibility Test) इतर
आरोपींसोबत संगनमत करुन अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पास केले. यासाठी त्याने कोट्यावधी रुपये घेतल्याची माहिती आहे.

अटक करण्यात आलेला तुकाराम सुपे हा त्याचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर विद्यार्थ्यांची नावे त्यांची हॉल तिकीट पाठवत असल्याचे उघड झाले आहे.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सुनील घोलप याच्याकडून तुकाराम सुपे याचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- TET Exam Scam | Pune Police Arrested Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supes Driver in TET Exam Scam

 

हे देखील वाचा :

Corporator Archana Tushar Patil | प्रभागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरु करा; भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणी

Pune Crime | हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण, पुण्याच्या कोथरूड परिसरातील हॉटेल स्पाईस गार्डनमधील घटना

Gold Silver Price Today | खूशखबर ! वर्षाच्या अखेरीस सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts