IMPIMP

MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक ! आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

by nagesh
Nitesh Rane | BJP MLA nitesh rane get judicial custody till february 18 court

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) सध्या रणधुमाळी सुरू आहे. आज (गुरुवारी) मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान या निवडणूकीत सिंधुदुर्गात राजकीय घडामोड पाहायला मिळते. निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसैनिकाला झालेल्या मारहाण प्रकरणात नितेश राणे (MLA Nitesh Rane) अडचणींच्या कचाट्यात सापडले आहेत. यानंतर त्यांनी अटकपुर्व जामीन अर्ज देखील दाखल केला. त्यावर आज सुनावणी असतानाच दुसरीकडे नितेश राणेसह भाजपला (BJP) मोठा दणका बसला आहे. नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नितेश राणे (MLA Nitesh Rane) ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून (Narayan Rane) कर्जरुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे सहकार विभागाने राणेंना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. तर, या निवडणुकीत नारायण राणे यांच्यासह नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. खरंतर आज होणाऱ्या निवडणुकीत सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) यांचे नाव संतोष परब (Santosh Parab) मारहाण प्रकरणात आल्यामुळे मनीष दळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court) अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. मात्र निकाल प्रलंबित असल्याने आज प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मनीष दळवी आपला मतदानाचा हक्क आहे तो कसा बजावतात? हे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत आहे. आज (गुरूवारी) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 4 पर्यंत मतदान समाप्त होणार आहे. दरम्यान, या मतदानाचा निकाल उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : MLA Nitesh Rane | sindhudurg district central bank election cooperative department denied voting rights to nitesh rane

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | ‘कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लोक नियम पाळत नाहीत, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्याकडून सूचक संकेत

MP Sambhajiraje Chhatrapati | ‘देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…’

Sharad Pawar | शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं, मात्र’

 

Related Posts