IMPIMP

MLA Siddharth Shirole | बीआरटी मार्गावरून जाण्याची परवानगी खासगी गाड्यांना द्यावी; आ. सिद्धार्थ शिरोळे यांची विधीमंडळात मागणी

by nagesh
MLA Siddharth Shirole | Allow private vehicles to ply on BRT route; come Siddharth Shirole's demand in the legislature

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   MLA Siddharth Shirole | वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील बीआरटी मार्गावरून खाजगी गाड्यांना जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी चर्चेत बोलताना आज (गुरुवारी) केली. (MLA Siddharth Shirole)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे शहराच्या बीआरटी बाबत ही लक्षवेधी सूचना आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली होती. या लक्षवेधी चर्चेमध्ये आमदार शिरोळे यांनी सहभाग घेतला. (MLA Siddharth Shirole)

 

प्रशासन जर बीआरटी बंद करत नसेल तर ज्या खासगी बसगाड्या व अन्य गाड्या पुण्यातून रांजणगाव, हिंजवडी तसेच उपनगरांमधून राष्ट्रीय महामार्गावर जातात अशा खासगी गाड्यांचे मालक-चालक शुल्क भरायला तयार असून त्यांना शुल्क आकारून बीआरटी मार्गांवरून जाण्यास परवानगी द्यावी, असे आ.शिरोळे यांनी सांगितले.

 

 

सध्या पीएमपीएमएल ची बसगाडी दर ५ मिनिटाला एक याप्रमाणे बीआरटी मार्गावरून धावत नाही.
तसेच दोन बसगाड्यांच्या वेळेमध्ये अंतर सुद्धा जास्त असते. हे लक्षात घेऊन संगमवाडी बीआरटी मार्ग,
हडपसर बीआरटी मार्ग, कात्रज बीआरटी मार्ग या मार्गांवर जर खासगी गाड्यांना परवानगी दिली तर पुणे
शहराचा बराचसा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यावर मंत्री महोदयांनी विचार करावा, अशी मागणी चर्चेच्या दरम्यान आ.शिरोळे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावर उत्तर देताना मंत्री महोदय उदय सामंत म्हणाले, आ.शिरोळे यांची सूचना विचारात घेऊन सबंधित अधिकारी
व तज्ज्ञांशी चर्चा करून बीआरटी मार्गांवरून खासगी गाड्या जाऊ शकतात का? आणि याचा त्रास जर
नागरिकांना होणार नसेल तर, योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित समितीला देऊ, असे आश्वासन दिले.

 

Web Title :- MLA Siddharth Shirole | Allow private vehicles to ply on BRT route; come Siddharth Shirole’s demand in the legislature

 

हे देखील वाचा :

TET Scam | महाविकास आघाडीचा ‘हा’ नेताही टीईटी घोटाळ्यात? फडणवीसांच्या युक्तिवादानंतर होणार चौकशी

Nana Patole | महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले

Ambadas Danve | विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मांडली भूमिका

Bhumi Pednekar | अखेर भूमीने सांगितला ‘त्या’ सेक्स सीन मागील तिच्या भावना; म्हणाली “हा सिन करताना…….”

 

Related Posts