IMPIMP

TET Scam | महाविकास आघाडीचा ‘हा’ नेताही टीईटी घोटाळ्यात? फडणवीसांच्या युक्तिवादानंतर होणार चौकशी

by nagesh
TET Scam | tet scam after abdul sattar mva former minister varsha gaikwad on radar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून, शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) विरोधकांच्या निशान्यावर आहेत. शिंदे – फडणवीस सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी टीईटी (TET Scam) व गायरान जमिनीच्या प्रकरणावरून (Gairan Land Scam) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना घेरत चांगलेच धारेवर धरले. परंतु महाविकास आघाडीतील माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या टीईटी घोटाळ्यावरून (TET Scam) अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडीची सत्ता असताना टीईटी परीक्षेसाठी कंपन्यांना पात्रता नसताना मंत्रालयीन स्तरावरून पात्र करण्यात आले. असा प्रकार झाला नसता तर घोटाळा (TET Scam) घडलाच नसता, असा युक्तिवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) यांनी केला. याप्रकरणी तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा (Additional Chief Secretary Vandana Krishna) यांना चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे समजते.

 

राज्यात टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) मंत्रालयातील शिक्षण विभागाचे (Education Department) सहसचिव सुशील खोडवेकर (Joint Secretary Sushil Khodvekar) यांना अटक (Arrest) केली होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची घोषणा केली. मात्र, या घोटाळ्याच्या चौकशीचे गाडे फार पुढे सरकलेच नाही. परंतु आता राज्यातील शिंदे सरकार कडून या प्रकरणात वर्षा गायकवाड यांना टार्गेट करुन महाविकास आघाडीला कोंडीत पकडले जाऊ शकते.

 

प्रकरण आहे तरी काय?

टीईटी परीक्षा दोन गटांत घेतली जाते. त्यामध्ये पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशी दोन गटांत परीक्षा होते.
सन 2019 यावर्षी टीईटी परीक्षा घेतली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या या परीक्षेत
घोटाळा झाल्याचे सायबर पोलिसांनी (Cyber Police) उघडकीस आणले होते.
यादीतील नाव व प्रत्यक्ष शाळेत कार्यरत असलेल्यांपैकी औरंगाबादमधील प्राथमिकचे 120,
तर माध्यमिकच्या 29 शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या
मुलीचे नावही यामध्ये होते. टीईटी परीक्षेत हिना कौसर अब्दुल सत्तार शेख
(Hina Kausar Abdul Sattar Shaikh) ही मुलगी अपात्र होती तरी तिला वेतन मिळत होते.
अपात्र असतानाही त्या कोणत्या आणि कसल्या निकषावर वेतन घेत होत्या?, असा सवालही उपस्थित केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी तपासात 2019-20 च्या टीईटी परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले.
प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकालांची पडताळणी केली असता, त्यातील सात हजार 800 परीक्षार्थी अपात्र
असतानाही त्यांना पात्र ठरविल्याचे उघड झाले होते. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019-20 मध्ये पैसे देऊन
पात्र ठरलेल्या सात हजार 800 उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पोलिस व शिक्षण विभागाकडून पडताळणी केली होती.
त्यामध्ये परीक्षार्थींच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार, गुण वाढविणे व थेट प्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आले होते.

 

Web Title :- TET Scam | tet scam after abdul sattar mva former minister varsha gaikwad on radar

 

हे देखील वाचा :

Ambadas Danve | विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मांडली भूमिका

Nana Patole | महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले

BJP MLA Ashish Shelar | … म्हणूनच रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके, संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार

 

Related Posts