IMPIMP

MLA Siddharth Shirole – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगरचे ST स्टँड मूळ ठिकाणी लवकरच उभारले जाईल; मंत्री महोदयांचेआमदार सिद्धार्थ शिरोळे यांना आश्वासन

by nagesh
MLA Siddharth Shirole - Shivaji Nagar ST Stand | Shivajinagar's ST stand will soon be set up at its original location; Minister's assurance to MLA Siddharth Shirole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MLA Siddharth Shirole – Shivaji Nagar ST Stand | मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथून मूळ ठिकाणी शिवाजीनगर येथे स्थलांतरीत करणेबाबत लक्षवेधी सूचना आज आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधिमंडळात मांडली. (MLA Siddharth Shirole – Shivaji Nagar ST Stand)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर येथील एसटी स्टँड हे जुना पुणे – मुंबई हायवे (Old Pune-Mumbai Highway) वाकडेवाडी (Wakadewadi) येथे २०१९ पासून तीन वर्षांकरिता स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असताना शिवाजीनगर एसटी बस स्थानकासाठी सुंदर इंटिग्रेटेड विकास आराखडा तयार केला होता. परंतु मवीआ सरकार (MVA Govt) आल्यामुळे सर्व काम थांबले गेले तसेच एसटी बस स्थानकाबाबत कोणतेही काम झाले नाही असे शिरोळे म्हणाले. (MLA Siddharth Shirole – Shivaji Nagar ST Stand)

 

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची जागा महामेट्रो ने घेताना दोन्ही विभागांमध्ये सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार महामेट्रो ने इंटिग्रेटेड एसटी स्टँड बांधून देण्याचे ठरले होते. त्यामध्ये भूमिगत चे दोन मजले आणि तळमजला बांधून द्यावे असा करार झाला होता.

 

सध्या महामेट्रोचे (Maha Metro) काम पूर्ण झाले आहे पण कराराप्रमाणे बस स्थानकाचे काम सुरु झालेले नाही. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना पुन्हा बस स्थानक बांधणे अडचणीचे ठरणार आहे, त्यामुळे महामेट्रोने करारानुसार स्थानक बांधून द्यावे अशी मागणी शिरोळे यांनी केली. तसेच तिथं एक कमर्शिअल इमारत बांधून नॉन तिकीट रेव्हेन्यू सुधा प्राप्त करण्याचे अखले होते त्या बाबत पण शासनाने कार्यवाही करावी असे आमदार शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेत मांडले.

 

तसेच वाकडेवाडी येथे स्थलांतरीत केलेल्या बसस्थानकामुळे एकता नगर, वाकडेवाडी च्या स्थानिक
नागरिकांना वाहतूक कोंडी चा प्रचंड त्रास होत आहे. तसेच प्रवाशांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे असे शिरोळे यांनी आपल्या सुचनेत मांडले.

जुन्या शिवाजीनगर एसटी स्टँड येथे पुन्हा एसटी बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे, कारण नागरिकांना ती जागा
सोयीची आहे. मेट्रो, पी.एम.पी.एम.एल आणि रेल्वे यांची स्थानके ही त्याठिकाणी आहेत.
त्यामुळे connectivity पाहता, एसटी बस सेवा शिवाजीनगर येथील पूर्वीच्या बस स्थानकावरून सुरू
ठेवण्यास नागरिकांच्या व प्रवाशांच्या हिताचे ठरेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या लक्षवेधी दरम्यान मा. मंत्री महोदयांना ३ प्रश्न विचारले…

१) शिवाजीनगर बस स्थानक पुन्हा मूळ ठिकाणी हलवण्यात येईल का ?
२) असे असल्यास त्याला किती कालावधी लागेल ?
३) तत्कालीन महायुती सरकारने केलेला integrated प्लॅन आहे तो या जागी केला जाईल का?

यावेळी मा. मंत्री महोदयांनी या लक्षवेधीला सकारात्मक उत्तर दिले असून इंटिग्रेटेड विकास आराखडया
लवकरच शिवाजीनगर चे बसस्थानक उभारले जाईल असे आश्वासन मा. मंत्री महोदयांनी यावेळी दिले.

 

 

Web Title :- MLA Siddharth Shirole – Shivaji Nagar ST Stand | Shivajinagar’s ST stand will soon be set up at its original location; Minister’s assurance to MLA Siddharth Shirole

 

हे देखील वाचा :

Summer Diet Tips | उन्हाळ्यात आवश्य खा ‘हे’ 4 प्रकारचे मेलन, आरोग्य राहील चांगले !

Japan International Cooperation Agency (JICA) | राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची ‘जायका’समवेत चर्चा

Rita India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या सौजन्याने ‘महिलांचे आरोग्य आणि जागरूकता’ याविषयावरील कार्यशाळा संपन्न

 

Related Posts