IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यावर राज ठाकरेंचे फडणवीसांना पुन्हा एकदा पत्र

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | mns raj thackeary letter to bjp devendra fadnavis after withdrawing muraji patel nomination from andheri by poll rutuja latke

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या रिक्त
झालेल्या जागेवर होणारी पोटनिवडणूक (Andheri East By-Election) बिनविरोध करावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj
Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र पाठविले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief
Sharad Pawar) यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच पक्षांना केले होते. अखेर भाजपने (BJP) आपला उमेदवारी अर्ज मागे
घेण्याचे ठरविले आहे. त्यावर पुन्हा एकदा पत्र लिहून राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपचे आभार मानले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Uddhav Balasaheb Thackeray) दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे संयुक्त उमेदवार म्हणून मुरजी पटेल (Murji Patel) यांना रिंगणात उतरविले होते. या निवडणुकीवर आणि ऋतुजा लटके यांच्या महापालिकेतील नोकरीच्या राजीनाम्यावर मोठे सत्तानाट्य गेल्या आठवड्यात रंगले होते.

 

 

राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे एक विंनती पत्र लिहिले होते. तसेच शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच पक्षांना केले होते. त्यावर अखेर भाजपने निर्णय घेत माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरात याची घोषणा केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपच्या या ऐतिहासिक माघारीवर राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पत्रातून भाजपचे आभार मानले आहेत.
माझ्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला,
त्याबद्दल मी आपले आणि पक्षातील नेतेमंडळींचे आभार मानतो.
सकारात्मक राजकीय संस्कृती ही सदृढ समाजासाठी आवश्यक असते.
ही संस्कृती वाढावी यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कायम काम करत असतो.
त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्द्ल तुमचे पुन:श्र्च आभार, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns raj thackeary letter to bjp devendra fadnavis after withdrawing muraji patel nomination from andheri by poll rutuja latke

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुर्ववैमनस्यातून तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचे खासदार सुळेंना प्रत्युत्तर, म्हणाल्या – ‘भाजपाची काळजी सोडा सुप्रियाताई…, A for अमेठी, B for…’

Kishori Pednekar | ‘हे भाजपला उशिरा आलेले शहाणपण’, पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल

 

Related Posts