IMPIMP

Kishori Pednekar | ‘हे भाजपला उशिरा आलेले शहाणपण’, पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल

by nagesh
Kishori Pednekar | kishori pednekar will be interrogated today in the sra scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपने (BJP) अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून (Andheri By-Election) यशस्वीरित्या माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी सर्व पक्षांचे आणि नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने मुंबईच्या माजी महपौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला असल्याचे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

 

भाजपने काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आहे. भाजपने या निवडणुकीत गेला आठवडाभर आडमुठेपणा केला. त्यांनी आताच पत्र का दिले? एक महिना अगोदर का नाही दिले? या धावपळीत ऋतुजा लटके यांना आणि शिवसेनेला जो मानसिक त्रास झाला तो ते कसा भरून काढणार आहेत? असे अनेक प्रश्न पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी उपस्थित केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार त्याचा आम्हाला आनंद आहे. भाजपने काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आहे. लटके यांना ज्याप्रकारे राजीनामा देताना त्रास झाला. त्यांना ज्याप्रकारे लटकविण्यात आले, ते लोक कधीही विसरु शकणार  नाहीत. आमच्या पक्षप्रमुखांनी नेहमीच आपली परंपरा, संस्कृती पाळली आहे. दिवंगत व्यक्तीच्या मागे पती, पत्नी, मुलगा, मुलगी कोणीही असले तरी आपण त्याला मार्ग मोकळा करुन द्यायचा असतो. पण भाजपने या प्रकरणात फार आडमुठेपणा केला. मुरजी पटेल (Murji Patel) हे खोटे जात प्रमाणपत्र दिल्याने बाद झालेले होते. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला जाणार असल्याची सर्वांना कल्पना आली. हे भाजपला उशिरा आलेले शहाणपण आहे, असे देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

Web Title :- Kishori Pednekar | andheri bypoll election uddhav thackeray faction kishori pednekar after bjp withdraws nomination muraji patel

 

हे देखील वाचा :

Andheri By-Election | राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपाची माघार, मनसेने प्रतिक्रिया देताना म्हटले – ‘जर हा निर्णय…’

Pune Crime | कुख्यात गजा मारणे टोळीतील आणखी एकाला अटक; आतापर्यंत 10 जणांना अटक

Rutuja Latke | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Pune Crime | महिलेकडे 40 लाखाची खंडणी मागणारा इराणी गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Related Posts