IMPIMP

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचे खासदार सुळेंना प्रत्युत्तर, म्हणाल्या – ‘भाजपाची काळजी सोडा सुप्रियाताई…, A for अमेठी, B for…’

by nagesh
 Chitra Wagh | bhim army threatened to throw ink on chitra wagh face

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपा (BJP) आता पक्ष राहिला नसून लॉन्ड्री झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केली होती. या टीकेला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उत्तर दिले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्विट केले असून यात म्हटले आहे की, 2024 साठी आपल्या लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या…A for Amethi, B for Baramati…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशातील महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली असल्याने पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. शिवाय इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपा आपल्या पक्षात प्रवेश देत असल्यावरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

 

सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, आधी भाजपा पक्ष होता. पण आता भाजपा पक्ष राहिला नसून लॉन्ड्री झाली आहे. भाजपामध्ये जिकडे-तिकडे इतर पक्षातून आलेले नेते दिसतात. ज्यांनी भाजपाला वाढवली ते खरे कार्यकर्ते आज कुठे आहेत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

 

आपल्याला आठवत असेल तर …

दरम्यान, सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार आणि
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (MP Kapil Patil) म्हणाले,
आपल्याला आठवत असेल तर 2019 च्या निवडणुकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक छापली होती.
भर सभेत त्यांनी ते पुस्तक दाखवले होते. आता दोघेही एकत्र आले आहेत.
याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? खरं तर राजकारणात अशी स्थित्यांतरं येत असतात,
जो-तो आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत असतो. त्यामुळे आपण मागे काय केलं, याचा विचार करुनच वक्तव्य करायला हवे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामनातून करण्यात आलेल्या टीकेलाही कपिल पाटील यांनी उत्तर दिलं.
ते म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची होती.
ही भाजपची भूमिका नव्हती. त्यामुळे भाजप त्यांचा कॉन्ट्रॅक्ट किलर (Contract Killer) म्हणून वापर करते,
असा आरोप करणं योग्या नाही.

 

Web Title :- Chitra Wagh | chitra wagh responded to ncp mp supriya sules criticism of bjp

 

हे देखील वाचा :

Kishori Pednekar | ‘हे भाजपला उशिरा आलेले शहाणपण’, पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल

Andheri By-Election | राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपाची माघार, मनसेने प्रतिक्रिया देताना म्हटले – ‘जर हा निर्णय…’

Pune Crime | कुख्यात गजा मारणे टोळीतील आणखी एकाला अटक; आतापर्यंत 10 जणांना अटक

 

Related Posts