IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे सभेतील ‘या’ वक्तव्यांमुळे आले अडचणीत, पोलिसांनी घेतला आक्षेप!

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | police take objection to some provocative statements of raj thackeray aurangabad sabha

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) अडचणीत
सापडण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) सभेमधील राज ठाकरेंच्या काही वक्तव्यांवर आक्षेप घेतला असून त्यांच्यासह सभेचे
आयोजक राजीव जावळीकर (Rajeev Jawalikar) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खालील चिथावणीखोर मुद्दे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद
केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. जर सभेच्या वेळेला बांग सुरु करणार असतील, आपण आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा यांना जर सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्या नंतर महाराष्ट्रात काय होईल हे मला माहीत नाही. येथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील तर त्यांना मी सांगतो की, आत्ताचे आत्ता पहिले जाऊन बंद करा”, असं राज ठाकरे म्हणाले होते. सभेवेळी अजान चालू झाल्याने त्यांचा पारा चढलेला होता. हे वक्तव्य पोलिसांनी एफआयआरमध्ये घेतलं आहे. (MNS Chief Raj Thackeray)

 

संभाजीनगरच्या पोलिसांना माझी नम्र विनंती परत करतोय मी आपल्याला परत सांगतोय ते जर या पध्दतीने वागणार असतील त्यांना जर सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे, ती यांना एकदा दाखवावीच लागेल. माझी संपूर्ण देशवासियांना आणि देशातल्या माझ्या हिंदु बाधवांना-भगिनींना माझी विनंती आहे की, बिलकुल मागचा पुढचा काही विचार करु नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे.

 

सगळ्या धार्मिक स्थळावरचे मग मंदिरावरचे असतील तरी उतरले गेले पाहीजे, पण यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण. आज ही परीस्थिती आहे. अभी नही तो कभी नही. जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही तर 4 तारखेला हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) मला ऐकु आलीच पाहिजे. पोलिसांकडून वाटल्यास परवानगी घ्या. रितसर परवानगी घ्या, लाऊडस्पीकरची (Loudspeaker) परवानगी घ्या, त्यांना द्यावी लागते, पण ती परवानगी घेऊन आपण सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या हा इतक्या वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज ठाकरे यांची सभेतील ही वक्तव्य एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर (Office of the Commissioner of Police Aurangabad City)
मार्फत त्यांना लेखी पत्राने घालून दिलेल्या व संयोजकाच्या बैठकीत समजावुन सांगितलेल्या
अटींंचा भंग केला म्हणून राज ठाकरे आणि संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक गजानन फकीरराव इंगळे (Gajanan Fakirrao Ingle) यांनी सरकारतर्फे फिर्यादी म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | police take objection to some provocative statements of raj thackeray aurangabad sabha

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल’, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेने दिला इशारा

Maharashtra Intelligence Department Alert | गुप्तचर विभागाचा अलर्ट ! परराज्यातील लोक महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात

CM Uddhav Thackeray | ‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’ ! CM उद्धव ठाकरेंचे पोलिसांना स्पष्ट निर्देश

 

Related Posts