IMPIMP

Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt | ‘उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील’ – राज ठाकरे

by nagesh
Raj Thackeray | raj thackerays comment on bjp shinde group and mns alliance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनRaj Thackeray On Shinde-Fadnavis Govt | राज्यातील सत्तांतर नाट्यात शिंदे गट आणि भाजपाला साथ देणार्‍या मनसेने पुन्हा एकदा आपल्या इंजिनाचा ट्रॅक बदलल्याचे दिसत आहे. काही दिवसांपासून मनसेकडून सतत शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीच राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. ते मुंबईत पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. (Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या मेळाव्यात पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, राज्यात सध्या राजकारण हा एक खेळ करुन टाकला आहे. खरंतर राजकारण गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. पण सध्याच्या सरकारच्या भाषेत सांगायचे झाले तर राजकारणाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. उद्या कोजागिरी, मंगळागौर आणि वर-वधू वरमाला घालताच द्या आता आम्हाला खेळाचा दर्जा असे म्हणतील, अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. (Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt)

 

शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता अगं अगं म्हशी…हेच सुरू आहे. त्यामुळे निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. केव्हाही लागतील पण त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. राजकारणात लोकांनी यायला हवे. कारण राजकारण अतिशय गांभीर्याने घ्यायचा विषय आहे.

 

तुमच्या घरात नळाला येणारे पाणी महानगरपालिका ठरवते. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता.
मग मतदानाच्या दिवशी दोन-दोन तास रांगेत उभे राहून मतदान का करता? त्यामुळे राजकारण म्हणजे केवळ मतदान नव्हे.
जनतेने जागे होणे गरजेचे आहे. युवापीढीने राजकारणात येणे खूप महत्वाचे आहे. सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt | MNS chief raj thackeray says tomorrow the bride and groom will ask for sports status attacks on shinde government

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | पक्षाच्या चिन्हाबाबत शिवसेनेला तुर्तास दिलासा; सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Early Puberty Signs | तुमचा मुलगा किंवा मुलगी अकाली तरुण होत आहेत का? ‘ही’ लक्षणे दिसताच पालकांनी व्हावे सतर्क

Aadhar Update | आधार बनवण्यासाठी आता होणार नाही दगदग, UIDAI ने केली ही घोषणा

 

Related Posts