IMPIMP

MNS on Sharad Pawar | मनसेने बाबासाहेब पुरंदरेंचे ‘ते’ पत्र केलं जाहीर; म्हणाले – ‘…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी’

by nagesh
Koregaon-Bhima Violence Case | NCP Chief sharad pawar will appear as a witness again in mumbai regarding the violence at koregaon bhima of pune district

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS on Sharad Pawar | गुढीपाडवा मेळाव्यात आणि ठाण्यातील उत्तरसभेत बोलताना मनसे (MNS) अध्यक्ष
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) जोरदार घणाघात केला. यानंतर राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात राजकीय शीतयुद्ध
रंगल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तरसभेत राज ठाकरे यांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून देखील राज यांच्यावर पलटवार करण्यात आला. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare), जेम्स लेनचं (James Lane) पुस्तक आणि जातीपातीचं राजकारण याबाबत बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. आता मनसेने एक पत्र जाहीर करत शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केलीय. (MNS on Sharad Pawar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी हे पत्र समोर आणले आहे. एका शिवप्रेमीने आपल्याला हे पत्र पाठवल्याचं देशपांडे यांनी सांगितलं. त्या पत्रात म्हटलं आहे की, ‘ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केलं आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेननं जे विधान केलंय, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी 25 नोव्हेंबर 2003 पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावं. जर प्रकाशक आणि लेखकानं असं काही केलं नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू, असं या पत्रातून बाबासाहेब पुरंदरे व अन्य इतिहासकारांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला सांगितल्याची त्यांनी माहिती दिली. (MNS on Sharad Pawar)

 

 

या पत्रावरुन संदीप देशपांडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मला वाटतं हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. जे काल शरद पवार म्हणाले होते की बाबासाहेब पुरंदरेंनी याबाबत कुठेही काही म्हटलं नाही, त्यावर हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. त्यांच्या भावना या पत्रात बाबासाहेबांनी व्यक्त केल्या आहेत. या पत्राची कल्पना 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. तरीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला गेला. राज ठाकरे भाषणात जे म्हणाले की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं आहे, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

 

पुढे संदीप देशपांडे म्हणाले, “त्यांनी म्हटलं होतं की माझ्याकडे यासंदर्भात माहिती नाही. आता माहिती समोर आली आहे. हे पत्र त्यांनी बघावं. जर त्यांना वाटलं की चूक झाली आहे, तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागितली पाहिजे,” असं ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शरद पवार काय म्हणाले होते ?
“जेम्स लेननं केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंकडून ही माहिती घेतली असं म्हटलं होतं.
एखाद्या लेखकाने गलिच्छ प्रकारचं लिखाण केलं आणि त्याला माहिती देण्याचे काम पुरंदरेंनी केलं.
त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका – टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो.
त्यामुळे याबाबत कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल फारसं बोलायचं नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- MNS on Sharad Pawar | mns sandeep deshpande asks apology sharad pawar on babasaheb purandare james lane

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | ‘मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा फोटो फडणवीसांनी शेअर करावा’ – अमोल मिटकरी

Riddhima Kapoor Sahni Photos | रणबीर कपूरची सख्खी बहिण दिसते अगदी राजकुमारी सारखी, पाहा रिद्धीमा कपूरचे व्हायरल फोटो..

Post Office Saving Scheme | ‘या’ 3 योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास मिळते 7% पेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

Related Posts