IMPIMP

Amol Mitkari | ‘मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा फोटो फडणवीसांनी शेअर करावा’ – अमोल मिटकरी

by nagesh
Amol Mitkari | amol mitkari devendra fadanvis ncp mlc amol mitkari criticizes bjp leader devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Amol Mitkari | राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती साजरी केली जात आहे तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यात संघर्ष चालू आहेत. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शरद पवार हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना, राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा फोटो देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या कुठल्याही नेत्याने ट्विट करावा, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे.

 

देवेंद्र फडणवीस आपण आज बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे जे सोंग केले ते वरवरुन आहे का ? एकीकडे संविधान आणि जय भिम म्हणायचं आणि आतून मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्याचं षडयंत्र रचायचं ?, हेच आयुष्यभर करणार आहात का ?, असा सवाल करत मिटकरी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

 

दरम्यान, सत्तेत नसल्याने काही काम धंदा उरला नसल्यामुळे विरोधी पक्षनेत्याने 14 एप्रिलचं निमित्त साधून 14 ट्विट केले त्यामध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष दिसून येतो. जर मुस्लीम द्वेष्टे आहात तर शहानवाज हुसेन व मुक्तार अब्बास नकवी यांच्याबद्दल बोला, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Amol Mitkari | amol mitkari devendra fadanvis ncp mlc amol mitkari criticizes bjp leader devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Riddhima Kapoor Sahni Photos | रणबीर कपूरची सख्खी बहिण दिसते अगदी राजकुमारी सारखी, पाहा रिद्धीमा कपूरचे व्हायरल फोटो..

Post Office Saving Scheme | ‘या’ 3 योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास मिळते 7% पेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर गृहमंत्र्यांचा इशारा; म्हणाले – ‘राज्यातील परिस्थिती बिघडू देणार नाही, तर..’

 

Related Posts