IMPIMP

Post Office Saving Scheme | ‘या’ 3 योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास मिळते 7% पेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती

by nagesh
Post Office Saving Scheme | savings post office savings schemes interest rates sukanya samriddhi yojana ppf kisan vikas patra

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Saving Scheme | ज्याप्रमाणे बँक नागरिकांना बचत योजना ऑफर करते, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील बचत योजना ऑफर करते (Post Office Saving Scheme). योजनांची नावे वेगळी असू शकतात परंतु सर्व गुंतवणूक पर्याय आहेत. पोस्ट ऑफिसच्या ज्या तीन योजनांमधील (PO Saving Scheme) गुंतवणुकीवर 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर मिळतो त्यांची माहिती घेवूयात. या तीन योजना आहेत – ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizen Savings Scheme (SCSS), PPF Account (पीपीएफ खाते) – Public Provident Fund (PPF Account) आणि सुकन्या समृद्धी खाते योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. ज्येष्ठ नागरिक बचत योजना

व्याजदर – 7.4 टक्के (व्याज तिमाही मिळेल)

उदाहरण – रु. 10,000 ठेवीवर तिमाही व्याज रु. 185 मिळेल.

ही योजना 60 वर्षांवरील लोकांसाठी आहे. याशिवाय 55 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त सिव्हिल कर्मचारी देखील काही अटींच्या अधीन राहून यामध्ये गुंतवणूक करू शकतात. 50 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी देखील समान अटींच्या अधीन हे खाते उघडू शकतात. त्याची कमाल ठेव मर्यादा रु. 15 लाख आहे. 31 मार्च/30 जून/30 सप्टेंबर/31 डिसेंबर रोजी खाते उघडण्याच्या तारखेपासून तिमाही आधारावर व्याज देय आहे. (Post Office Saving Scheme)

 

2. पीपीएफ

व्याजदर – 7.1 टक्के (वार्षिक व्याज प्राप्त होईल)

कोणताही प्रौढ, जो भारतीय नागरिक आहे, पीपीएफ खाते उघडू शकतो. याशिवाय, एक पालक अल्पवयीन/मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो. पोस्ट ऑफिस किंवा देशभरातील कोणत्याही बँकेत फक्त एकच खाते उघडता येते. आर्थिक वर्षात जमा करता येणारी किमान रक्कम 500 रुपये आणि कमाल रक्कम 1,50,000 रुपये आहे. कोणत्याही आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा न केल्यास खाते बंद केले जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. सुकन्या समृद्धी खाते

व्याजदर – 7.6 टक्के (वार्षिक व्याज मिळेल)

सुकन्या समृद्धी खाते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने पालक हे खाते उघडू शकतो. पोस्ट ऑफिस किंवा भारतातील कोणत्याही बँकेत मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते. हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. ज्यामध्ये, जुळ्या/तिळ्या मुलींचा जन्म झाल्यास, दोनपेक्षा जास्त खाती उघडण्याची परवानगी दिली जाईल. एका आर्थिक वर्षात खात्यात किमान ठेव रक्कम 250 रुपये आहे तर कमाल ठेव मर्यादा रुपये 1,50,000 आहे.

 

Web Title :- Post Office Saving Scheme | post office schemes to get more than 7 percent interest rate on investment

 

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर गृहमंत्र्यांचा इशारा; म्हणाले – ‘राज्यातील परिस्थिती बिघडू देणार नाही, तर..’

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नीचा चाकूने गळा कापून खून

Devendra Fadnavis | ‘शरद पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात’; देवेंद्र फडणवीसांची टीका

 

Related Posts