IMPIMP

Motilal Oswal Mutual Fund NFO | कमाईची संधी ! कालपासून खुला झालाय नवीन फंड; 500 रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक, जाणून घ्या डिटेल्स

by nagesh
Motilal Oswal Mutual Fund NFO | nfo motilal oswal mutual fund announces the launch of motilal oswal sp bse financials ex bank 30 index fund check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMotilal Oswal Mutual Fund NFO | मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने मोतीलाल ओसवाल S&P BSE फायनान्शियल एक्स बँक 30 इंडेक्स फंड (Motilal Oswal S&P BSE Financials ex Bank 30 Index Fund) लाँच करण्याची घोषणा केली आहे. ही एक एस अँड पी बीएसई फायनान्शियल्स एक्स बँक 30 टोटल रिटर्न इंडेक्सच्या एकुण रिटर्नची रेप्लिकेटिंग/ट्रॅकिंग करणारी एक ओपन-एंडेड स्कीम आहे. या स्कीम सबस्क्रीप्शन 14 जुलैपासून सुरू झाले आहे.

 

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही नवीन फंड ऑफर (NFO) 14 जुलै 2022 रोजी खुली झाली आहे आणि 22 जुलै 2022 रोजी बंद होईल. हा अशा प्रकारचा पहिला पॅसिव्ह फंड असेल, ज्याचा उद्देश बँका वगळून फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरला एक्सपोजर प्रदान करणे हा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इंडेक्समध्ये S&P BSE 250 लार्ज मिडकॅप टोटल रिटर्न इंडेक्सचे टॉप 30 नॉन-बँकिंग वित्तीय स्टॉक समाविष्ट होतील, ज्यांचे कमाल स्टॉक वेटेज 15 टक्के असेल. जून आणि डिसेंबरमध्ये इंडेक्स रिबॅलन्स केला जाईल. सध्या, इंडेक्समध्ये हाऊसिंग फायनान्स कंपन्या, एनबीएफसी, एक्सचेंजेस, असेट मॅनेजमेंट कंपन्या, विमा, कार्ड पेमेंट आणि फिनटेक यांच्या स्टॉकचा समावेश आहे.

 

किमान गुंतवणूक रु. 500

म्युच्युअल फंड कंपनीनुसार, एनएफओ दरम्यान, गुंतवणूकदार किमान रु 500 आणि त्यानंतर रु. 1 च्या पटीत गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणूकदार हे स्कीमच्या यूनिट फायनान्शियल अ‍ॅडव्हायजर किंवा कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून योजनेच्या युनिट्सची खरेदी आणि विक्री करू शकतात.
असे गुंतवणूकदार ज्यांना लाँग टर्म कॅपिटल ग्रोथ हवी आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. मात्र, यात रिटर्नची गॅरंटी नसते.

 

Web Title :- Motilal Oswal Mutual Fund NFO | nfo motilal oswal mutual fund announces the launch of motilal oswal sp bse financials ex bank 30 index fund check details

 

हे देखील वाचा :

High Uric Acid | ‘या’ 5 चुकांमुळे शरीरात वाढू लागतो यूरिक अ‍ॅसिडचा स्तर; जाणून घ्या

Income Tax Return for AY2022-23 | फॉर्म 26AS च्या चूका दुरूस्त करून घेतल्या तर वाचतील टॅक्सचे पैसे

World Expensive Share | गाडी-बंगला, नोकर-चाकर, बँक बॅलन्स… ‘या’ 1 शेअरच्या किमतीत सर्वकाही शक्य

 

Related Posts