IMPIMP

ICC कडून क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन जाहीर; भारताच्या ‘या’ खेळाडूला मिळाले नामांकन

by nagesh
ICC | icc cricketer of the year for t20i suryakumar yadav nominate with 4 others

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – ICC ने गुरुवारी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी नामांकन झालेल्या खेळाडुंची यादी जाहीर केली. या यादीमध्ये 4 जणांना स्थान देण्यात आले. यामध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. तर उर्वरित तिघे हे झिम्बॉब्वे, इंग्लंड आणि पाकिस्तानचे आहेत. या खेळाडूचे नाव आहे सूर्यकुमार यादव. तसेच या यादीमध्ये सिकंदर रजा, सॅम करन आणि मोहम्मद रिजवान यांचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सूर्यकुमार यादवने यंदाच्या वर्षी धुमाकूळ घातला आहे. त्याने 31 सामन्यात 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा काढल्या आहेत. तसेच टी20 क्रिकेटमध्ये त्याने 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला असून असं करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

 

2022 या वर्षात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर सॅम करनने टी20 वर्ल्ड कपमध्ये मालिकावीरचा बहुमान पटकावला होता. तर फायनल सामन्यामध्ये तो सामनावीर ठरला होता. सॅम करनने या वर्षभरात 19 सामन्यात 25 विकेट घेतल्या. यापैकी 13 विकेट या टी20 वर्ल्ड कपमध्ये घेतल्या आहेत.

 

झिम्बॉब्वेचा सिकंदर रजा यादेखील या यादीमध्ये नामांकन मिळाले आहे.
त्याने यावर्षी 24 सामन्यात 735 धावांसह 25 विकेट घेतल्या आहेत. सिकंदर रजाला यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.
पंजाबच्या संघाने त्याला खरेदी केले आहे.

 

टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने सलग दुसऱ्या वर्षी जबरदस्त अशी कामगिरी केली.
त्याने मागच्या वर्षी 1326 धावा केल्या होत्या. तर यंदा त्याने 996 धावा केल्या आहेत.
केवळ 4 धावांमुळे सलग दुसऱ्या वर्षी 1 हजार धावा करण्याची कामगिरी हुकली. यामध्ये त्याने 10 अर्धशतके केली आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- ICC | icc cricketer of the year for t20i suryakumar yadav nominate with 4 others

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | गायरान जमिनी वाटपाप्रकरणी चौकशी होईपर्यंत सत्तारांचा राजीनामा घ्या – अजित पवार

Suicide in Taloja Jail | तळोजा जेलमध्ये बलात्कार प्रकरणातील 19 वर्षांच्या आरोपीची आत्महत्या, पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला

Teachers and Graduate Constituencies Election | विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, 5 जागांसाठी प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Politics | ‘बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर आमचा अधिकार’, शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे विधान!

 

Related Posts