IMPIMP

MP Sanjay Raut | ‘…अन्यथा फडणवीसांसह मोदींची प्रतिष्ठाही धुळीस मिळेल’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | 'BJP's use of Veer Savarkar only for vote politics' - Sanjay Raut

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन MP Sanjay Raut | एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अपात्रतेपासून संरक्षण दिल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान शिंदे गटाच्या या बंडाळीमुळे शिवसेनेच्यात (Shivsena) मोठा गोंधळ उडाला असल्याचं दिसत आहे. यातच ‘एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) असलेल्या बंडखोर आमदारांना आसामचं वातावरण एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे 11 जुलैपर्यंत त्यांना आसाममध्ये आराम करायचा आहे. महाराष्ट्रात या बंडखोरांचं काही काम नाही,’ असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले की, “सध्या राजकीय वातावरणात बदल सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडे 116 आमदारांचं बळ आहे. हा विरोधी पक्ष विधायक काम चांगल्या पद्धतीने करुन महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. फडणवीस यांच्याकडे ती क्षमता आहे. पण त्यांनी या डबक्यात उतरू नये. काही लोकांनी आता एक डबक तयार केलं आहे. त्यामुळे त्यांनी या डबक्यात उतरू नये अन्यथा पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), ते स्वत: आणि पक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळेल,” असंही ते म्हणाले.

 

दरम्यान, “12 आमदार राजभवनाच्या टेबलावर पडून आहेत, त्याबाबत निर्णय घ्यावा, असा टोला संजय राऊतांनी राज्यपाल कोश्यारींना लगावला आहे.
बंडखोरांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर चलबिचल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना काय करायचं हा त्यांचा निर्णय असून तो घेण्यासाठी ते सक्षम आणि समर्थ आहेत.
गुवाहाटीमध्ये बसुन सल्ले देण्याची गरज नाही,” असा अप्रत्यक्ष टोला देखील राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

 

Web Title :- MP Sanjay raut | shivsena leader and mp sanjay raut criticized to revolt shiv sena mla and advice to devendra fadnavis pm narendra modi

 

हे देखील वाचा :

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचं मोठं विधान

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत 160 GR; राज्यपाल कोश्यारींनी मागितला ठाकरे सरकारकडे खुलासा

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! “पिक्चर अभी बाकी है”; मनसेचं सूचक Tweet

 

Related Posts