IMPIMP

MP Sanjay Raut | ‘एवढे बदलले आमचे देवेंद्रजी?’ संजय राऊतांचा खोचक टोला

by nagesh
MP Sanjay Raut | devendraji are the daughters of the poor lying on the streets sanjay raut shared the photo itself

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विरोधकांनी सीमाप्रश्न, जमीन भ्रष्टाचार (Land Corruption) यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. याचदरम्यान विरोधाकांनी जमिनीच्या भ्रष्टाचार प्रकरणात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) हे देखील उपस्थित आहेत. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सध्या नागपूरमध्ये आहे. आज संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एवढे बदलले आमचे देवेंद्रजी?
संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, कधीकाळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते. तेव्हा त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. एकनाथ खडसे (Eknath Khadse) असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे इतर सहकारी यांनी त्या काळी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आणली. मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. मात्र, आज सत्तेत असताना त्यांना विरोधी पक्ष काढत असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाकेही वाटत नाहीत. एवढे बदलले आमचे देवेंद्रजी? असा खोचक सवाल राऊत यांनी केला.

 

सरकारने केलेला ठराव बुळचट
सीमा प्रश्नावर ठराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सीमा प्रश्नाचा ठराव वाहून जाऊ नये, आणि सरकारला कारण मिळू नये. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. सरकारने केलेला ठराव हा अत्यंत बुळचट आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा या मुद्याचा ठरावात उल्लेखही नाही. हा कसला ठराव, हा तर बेडकांचा डराव आहे, असे संजय राऊत म्हणाले.

हा काय लवंगी फटाका झाला?
राऊत पुढे म्हणाले, लवंगी फटका आहे की बॉम्बस्फोट आहे याचा निर्णय लागेल. पण दोन दिवसांपासून विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तारांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेतला आहे. हा लवंगी फटाका आहे का? कोट्यावधींचा व्यवहार झाला. कृषी महोत्सवासाठी काही कोटींची ठेकेदारी दिली पैसे गोळा करायला, हा काय लवंगी फटका झाला? एनआयटीचे 16 भूखंड वाटले गेले, विरोधी पक्षानं हा बॉम्ब फोडला, हा काय लवंगी फटका झाला का? असंही राऊत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फडणवीसांबद्दल सहानभूती वाटते
देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा लढाव लागणार आहे.
त्यांना या भ्रष्ट सरकारचं ओझ जास्त दिवस वाहता येणार नाही.
कृषी मंत्र्यांनी खंडणी गोळा केली, संपूर्ण सरकार सध्या अडचणीत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानभुती वाटते, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena sanjay raut slams devendra fadnavis bjp maharashtra assembly winter session

 

हे देखील वाचा :

Pune PMC Employee – 7th Pay Commission | पीएमपी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नववर्षाच्या सुरूवातीपासूनच 7 वा वेतन आयोग लागू

Happy Birthday Salma Khan | वाढदिवसानिमित्त रितेशने सलमान खानसाठी लिहिली ‘हि’ खास पोस्ट; म्हणाला…

Pune Cyber Crime | आयटी तरुणाला 40 लाखाच्या कर्जासाठी 27 लाखांना घातला गंडा

 

Related Posts