IMPIMP

Pune Cyber Crime | आयटी तरुणाला 40 लाखाच्या कर्जासाठी 27 लाखांना घातला गंडा

by nagesh
Pune Cyber Crime | 27 lakhs was charged to an IT youth for a loan of 40 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Cyber Crime | वडिलांचे आजारपण आणि पत्नीविरोधातील घटस्फोटाचा खटला, यासाठी ४० लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करणार्‍या आय टी तरुणाला सायबर चोरट्यांनी तब्बल २७ लाख ४५ हजार रुपयांना गंडा घातला. (Pune Cyber Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत एका ३६ वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१९/२२) दिली आहे. हा प्रकार मार्च २०२० ते ५ मे २०२२ दरम्यान ऑनलाईन घडला. (Pune Cyber Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका आय टी कंपनीमध्ये काम करतात. मार्च २०२० मध्ये त्यांचे वडिल आजारी असल्याने तसेच पत्नीसोबत पटत नसल्याने त्यांनी पत्नीविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. त्यांना कमी व्याज दरात ४० लाखांचे कर्ज देण्याचे एका फायनान्स कंपनीतून बोलणार्‍याने दिले. त्यानुसार त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. कर्जासाठी त्यांना प्रथम दीड लाख रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागविले जात होते.

 

त्यानंतर त्यांनी लोन नंबर देऊन बँकेचा कॅन्सल चेक घेऊन विश्वास संपादन केला.
नॉमिनी, कर्जाचे डिसबेसमेंट चार्ज, जी एस टी अशी वेगवेगळी कारणे सांगून सायबर चोरटे त्यांच्याकडून पैसे
काढत राहिले. विमा पॉलिसी घेण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली.
कर्जाची रक्कम मोठी असल्याने डी डी मार्फत कर्ज रक्कम पाठवितो, असे सांगून डी डी चार्ज म्हणून त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली. शेवटी तर आर बी आयमध्ये तुमची रक्कम अडकली आहे. त्यामुळे डिपॉझिट अमाऊंट म्हणून आणखी पावणे दोन लाख रुपये भरायला सांगितले. अशा प्रकारे ४० लाख रुपयांच्या कर्जासाठी तब्बल २७ लाख ४५ हजार ६५५ रुपये भरायला सांगून सायबर चोरट्याने तरुणाला चांगलाच गंडा घातला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Cyber Crime | 27 lakhs was charged to an IT youth for a loan of 40 lakhs

 

हे देखील वाचा :

EPFO Alert | ६ कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली महत्वाची माहिती, अजिबात करू नका हे काम

Devendra Fadnavis | पुणे शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागात ग्राहकांना सदोष वीज देयके, देवेंद्र फडणवीसांची कबुली; अभियंत्यांवर कारवाई सुरु

Winter Session 2022 | ‘विरोधकांकडून फक्त शिंदे गटातील मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे’, अजित पवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर

 

Related Posts