IMPIMP

MPSC Exam | राज्य सेवा परीक्षेच्या जागा वाढवल्या, MPSC कडून नवं परिपत्रक जाहीर

by nagesh
MPSC Exam 2023 | good news for competitive examinees more than 8 thousand posts recruitment

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Exam) सोमवारी (दि.4) अखेर विविध विभांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये आणखी 100 जागांची वाढ (increased 100 post) करण्यात येत असल्याचे आयोगाने शुक्रवारी (दि.8) संकेतस्थळावर शुद्धीपत्रक काढत जाहीर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने उपनिबंधक सहकारी संस्थांच्या 10 जागा, मुख्याधिकारी गट ‘अ’ च्या 15 तर मुख्य अधिकारी गट ‘ब’ च्या तब्बल 75 जागांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam) ही 390 पदांसाठी आयोजित केली जाणार आहे. एमपीएससीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

MPSC कडून नवं परिपत्रक

एमपीएससीनं नवीन परिपत्रक (Circular) काढत एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास 1 (गट अ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरीत आयोगाच्या संकेतस्थावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी व मुख्य परीक्षा 7,8 व 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

राज्य सेवा परीक्षेचं वेळापत्रक
मुख्य परीक्षा (Main exam) दि. 7,8 व 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य पूर्व परीक्षेसाठी अर्ज (MPSC Exam) दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील (open category) उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पदांचा तपशील
उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) – 12, पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) 16,
सहकार राज्य कर आयुक्त -16, गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ 15,
उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4,
सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 1,
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1, सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्यधिकारी गट ब 75, मुख्यधिकारी गट अ 15, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे.

 

Web Title :- MPSC Exam | maharashtra public service commission increased 100 post for state service exam publish revised advertisement for state service exam

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | राष्ट्रवादीच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे…’

Pune Crime | पुणे सीआयडीकडून फरारी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला अटक, शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिराजवळ वेषांतर करून कारवाई

Pune Police Crime Branch | 7 वर्षे फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

 

Related Posts