IMPIMP

MPSC तर्फे राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती; स्पर्धा परीक्षेच्या 15 हजार जागा भरणार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

by nagesh
MPSC Exam 2023 | good news for competitive examinees more than 8 thousand posts recruitment

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला (Recruitment Process) गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी (Vacancies) भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या प्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे तशीच काळजी मलाही आहे. एमपीएससी (MPSC) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करु नये. या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या असल्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अर्हम फाउंडेशन (Arham Foundation) व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त (Vastav Katta) विद्यमाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा’ या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे (Administrative Officer Mahesh Jhagde), फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया (Foundation President Dr. Shailesh Pagaria), अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेंडगे (Ahilya Shikshan Sanstha President Suresh Shendge), महेश बडे (Mahesh Bade), किरण निंभोरे (Kiran Nimbhore) उपस्थित होते. यावेळी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

15 हजार जागा भरल्या जाणार

कोरोनामुळे (Corona) मागील दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती.
परंतु आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे.
त्यानुसार सुमारे 15 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 8 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षांबाबत कोणताही गोंधळ आता होणार नाही.
वर्षभरात सर्व रिक्त पदे भरली जाऊन नेमणुकाही दिल्या जाणार असून मोठा भाऊ या नात्याने आपल्यासाठी काम करणार असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

 

Web Title :- MPSC | fill 15000 competitive examination MPSC seats in Maharashtra Minister dattatraya Bharne

 

हे देखील वाचा :

Health Alert | पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर अतिशय धोकादायक, कॅन्सरसह अनेक आजार होण्याची शक्यता; जाणून घ्या

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

MP Navneet Rana | खा. नवनीत राणांनी केलेल्या आरोपांची ‘पोलखोल’; Mumbai CP संजय पांडेंनी केला ‘तो’ व्हिडीओ Tweet

 

Related Posts