IMPIMP

Health Alert | पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर अतिशय धोकादायक, कॅन्सरसह अनेक आजार होण्याची शक्यता; जाणून घ्या

by nagesh
Drinking Cold Water Is Good Or Bad | drinking cold water is good or bad know what study says on it

सरकारसत्ता ऑनलाइन – Health Alert | मोठ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून (Plastic Bottles) तुमचे घर किंवा ऑफिसमध्ये पोहोचवले जाणारे पाणी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते (Health Alert). एका संशाधनानुसार, तुम्ही अशा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरलेले पाणी पिऊ नये, जे जास्त काळ उष्णता किंवा सूर्यप्रकाशात ठेवलेले आहे. कारण त्यामुळे कर्करोगासारखे अनेक आजार होऊ शकतात (Use Of Plastic Bottles Is Very Dangerous).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

NBT च्या वृत्तात असे म्हटले आहे की, या पाण्याच्या बाटल्या कडक उन्हात अनेक दिवस राहतात. प्लॅस्टिकचा अभ्यास करणार्‍या संशोधकांना असे आढळून आले आहे की, या बाटल्या सतत सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने प्लास्टिकमधून बाहेर पडणारी रसायने पाण्यात विरघळण्याची शक्यता असते (Health Alert).

 

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्यापूर्वी विचार करा (Think Before Drink Water From Plastic Bottles)
अशा बाटल्यांमधून पाणी पिण्यापूर्वी, ते पाणी दीर्घकाळ प्रखर सूर्यप्रकाशात ठेवले होते किंवा नाही याचा विचार केला पाहिजे. नॅशनल जिओग्राफिकच्या (National Geographic) अहवालात असे म्हटले आहे की प्लॅस्टिकच्या वस्तू पेये किंवा अन्नामध्ये कमी प्रमाणात रसायने सोडतात. जसजसे तापमान आणि वेळ वाढतो तसतसे प्लास्टिकमधील रासायनिक कण अधिक वेगाने वेगळे होतात आणि रसायने बाहेर पडण्याची शक्यता असते.

 

काय सांगतो डॉक्टरांचा सल्ला (What Doctor’s Advice Says)
डॉ. संदीप गुलाटी (Dr. Sandeep Gulati) यांनी एनबीटीला सांगितले की, प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील पाणी सतत प्यायल्याने मायक्रो-प्लास्टिकमुळे (Micro-plastic) पोटाशी संबंधित आजार (Stomach Problems) होऊ शकतात. अहवालात पुढे म्हटले आहे की यामुळे हार्मोनल असंतुलन देखील होऊ शकतो, ज्यामुळे पीसीओएस, गर्भाशयाच्या समस्या, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर (PCOS, Uterine Problems, Breast Cancer, Colon Cancer, Prostate Cancer) आणि बरेच आजार होऊ शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिण्याचे धोके (Dangers Of Drinking Water From Plastic Bottles)

1. डायऑक्सिन उत्पादन (Dioxin Production) :
थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे डायऑक्सिन नावाचे विष बाहेर पडते, जे सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर वाढू शकतो.

 

2. बीपीए जनरेशन (BPA Generation) :
बायफेनिल ए हे इस्ट्रोजेनची नक्कल करणारे रसायन आहे ज्यामुळे मुलींमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, प्रजनन समस्या,
वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि प्राथमिक लैंगिक समस्या अशा अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी साठवून न पिणे चांगले.

 

3. रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) :
जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितो तेव्हा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर खूप परिणाम होतो.
प्लास्टिकच्या बाटल्यांमधून निघणारी रसायने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खराब करतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. लिव्हर कॅन्सर आणि शुक्राणूंची कमी संख्या (Liver Cancer And Low Sperm Count) :
प्लास्टिकमध्ये phthalates नावाचे रसायन असल्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने लिव्हर कॅन्सर आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Alert | cancer from plastic bottles giant water cans being delivered at your house and office are hazardous

 

हे देखील वाचा :

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

MP Navneet Rana | खा. नवनीत राणांनी केलेल्या आरोपांची ‘पोलखोल’; Mumbai CP संजय पांडेंनी केला ‘तो’ व्हिडीओ Tweet

Pune Crime | विमाननगर परिसरात खुनाचा प्रयत्न; विश्रांतवाडीमध्ये दहशत पसरवणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

 

Related Posts