IMPIMP

Sachin Vaze Case : खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत प्रश्न, म्हणाले – ‘सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?’

by pranjalishirish
mukesh ambani bomb scare what nagpur connection sachin vaze casecongress mp kumar ketkar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सचिन वाझे Sachin Vaze  प्रकरण अधिक चर्चेत आलं असून या प्रकरणामध्ये अनेक नव नवी माहिती समोर येत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकामधे टीका टिपणी होताना दिसत आहे. तर दिल्लीत सुरु असलेल्या संसदीय अर्थसंकल्पावेळी काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत बोलताना सचिन वाझे प्रकरणाबाबत मुद्दा मांडला आहे. अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिन स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती, मात्र हे जिलेटिन कुठून आले आणि कोणत्या हेतूने ते देण्यात आलं होतं, याबाबत चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न केतकरांनी त्यावेळी केला आहे.

वाझे Sachin Vaze प्रकरणावरून कुमार केतकर म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिन स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती, नंतर त्या कार मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. परंतु या प्रकरणात ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले, ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही, या जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी १५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे जिलेटिन कोणी पुरवलं? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं? याचीही चौकशी होणं आवश्यक आहे अशी मागणी कुमार केतकर राज्यसभेत बोलताना केली आहे.

पुढे केतकर म्हणाले, सध्या महाराष्ट्र राज्यात २ प्रकरण चर्चेत आहेत, त्यात स्थानिक पोलीस आणि NIA तपास करत आहेत, एक म्हणजे लोकसभेचे विद्यमान खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली, डेलकर हे सात वेळा खासदार राहिले होते, त्यांच्या सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे मोहन डेलकरांनी मुंबईत आत्महत्या केली कारण त्याचं दीव-दमण आणि इतर राज्यातील सरकारवर विश्वास नव्हता असे केतकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एनआयएने ठाण्यातील साकेत सोसायटीत राहणारे सचिन वाझे Sachin Vaze यांच्या घराची बुधवारी झडती घेण्यात आली. तर त्यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांच्याकडे ४ ते ५ तास चौकशी केल्याची माहिती समजते. वाझेंच्या मर्सिडीज कारमध्ये सापडलेली ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम, इतर सामग्रीबाबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर NIA चे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली. मनसुख हिरेन आणि वाझे यांचे कसे संबंध होते? मनसुख यांच्या हत्येपूर्वी ते साकेत सोसायटीत आले होते का? वाझेंबरोबर काही वाद झाला होता का? अशा सर्व प्रश्नावरून वाझेंच्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते. तसेच सीआययूच्या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरूच आहे. सलग चौथ्या दिवशी साहाय्यक निरीक्षक रियाजुद्दीन काझी व प्रशांत होवाळे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. वाझेंच्या सांगण्यावरून अंबानींच्या घराच्या जवळ स्कॉर्पिओ लावणे, इनोव्हातून प्रवास करणे, यासंदर्भात विचारपूस केली जात आहे.

Also Read :

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts