IMPIMP

Mumbai Crime | पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकाकडून 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार, दाऊद टोळीच्या नावाने महिलेला दिली धमकी

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनMumbai Crime | मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (Juhu Five Star Hotel) महिला लेखिकेवर (Female Writer) व्यावसायिकाने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 75 वर्षाच्या व्यावसायिकाने (Professionals) 35 वर्षाच्या महिला लेखिकेवर जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. एवढेच नाहीतर आरोपीने दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) टोळीच्या नावाने धमकी (Threat) दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून व्यावसायिका विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात (Amboli Police Station) IPC 376(2)(एन), 504 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल (Mumbai Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटा मधील (1993 Bombay Bomb Blast) मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या नावाने बलात्कार पीडितेने धमकी दिल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेने म्हटले की, मे महिन्यात दादरमध्ये (Dadar) राहणाऱ्या एका 75 वर्षीय व्यावसायिकाने तिच्यावर अंधेरीतील (Andheri) पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक वेळा अत्याचार केले. याच दरम्यान व्यावसायिकाने तिच्याकडून 2 कोटी रुपये व्याजाने घेतले होते. परंतु ते परत केले नसल्याचा दावा महिलेने केला आहे. (Mumbai Crime)

 

व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी तसेच अत्याचाराबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी व्यावसायिकाने तिला दाऊद टोळीच्या (Dawood Gang) नावाने धमकावले.
दाऊद इब्राहिम माझा मित्र असून हाजी मस्तान (Haji Mastan) माझ्या पत्नीच्या बहिणीचा नवरा होता.
याबाबत कोठेही वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी (Death Threat) दिल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल
करुन हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Andheri MIDC Police Station) वर्ग केला आहे.

 

महिलेने तक्रारीमध्ये दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे. याची सत्यता पडताळण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Mumbai Crime | mumbai woman was threatened in the name of the dawood ibrahim writer lady woman rape case

 

हे देखील वाचा :

Maharashtra Crime News | धक्कादायक ! मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून; परिसरात खळबळ

Gopichand Padalkar On Supriya Sule | ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा; म्हणाले – ‘एका अर्थी मला आनंद..’

Jio Recharge Plan | Jio ची जबरदस्त ऑफर ! 22 किंवा 28 दिवस नव्हे एक महिन्यापर्यंत रोज मिळेल 1.5 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि खुपकाही

 

Related Posts