IMPIMP

Mumbai-Pune Expressway | मुंबई पुण्याच्या जवळ येणार म्हणजे नेमकं काय होणार, कशामुळं प्रवाशांचा 25 मिनीटं वेळ वाचणार; जाणून घ्या

by nagesh
Pune Highway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनMumbai-Pune Expressway | देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पुण्याच्या आणखी जवळ येणार आहे. कारण या दोन शहरांतील अंतर 6 किलोमिटरने कमी होणार आहे. यामुळे मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा 25 मिनीटं वेळ वाचणार आहे. या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी (Distance Reduced) मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) लोणावळा (Lonavala) ते खोपोली एक्झिट (Khopoli Exit) या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या एका बोगद्याचे काम पूर्ण होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

या मार्गावरील दोन बोगद्यांपैकी (Tunnels On Mumbai-Pune Expressway) एका बोगद्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) ठेवण्यात आले आहे. मुंबई – पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway) मार्ग आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग (Mumbai Pune National Highway) क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉरचं देखभाल, दुरुस्तीसाठी बीओटी (BOT) म्हणेजेच बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर 30 वर्षाच्या कालावधीसाठी राज्य सरकारने (Maharashtra State Government) 1999 पासून MSRDC कडे हस्तांतरीत केला आहे.

 

हे दोन मार्ग खालापूर टोल प्लाझाजवळ (Khalapur Toll Plaza) एकत्र मिळून पुढे खंडाळा एक्झिट (Khandala Exit) येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा (Adoshi Tunnel) ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून या भागात पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमिवर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव (Kusgaon) या भागातील 13.3 किमी राहिलेल्या मिसिंग लिंकचे (Missing Links) काम MSRDC कडून सुरु करण्यात आले आहे.

 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या प्रकल्पामुळे बोर घाटातील (Bore Ghat) सहा किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार

लोणावळापासून सुरु होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट येथे संपणार

यामध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह (Via Duct) आठ पदरी नवीन रस्ते बांधले जाणार आहेत

पुण्याकडून मुंबईला जाताना असणारा बोगदा 9 किमी लांबीचा आहे.

यातील साडेसहा किमीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

25 मिनिटे वेळ वाचणार

मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किमी लांबीचा एक बोगदा आहे. त्या बोगद्याचे काम पूर्ण झाले.

पुण्याकडून मुंबईला जाताना सर्वात मोठ्या लांबीचा म्हणजे 9 किमी लांबीचा बोगदा आहे.
त्याचेही काम जवळपास 72 टक्के पूर्ण झाले आहे. याशिवाय दोन दरीपूल आहेत.

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई – पुणे हे अंतर सहा किमीने कमी होणार असून प्रवाशांचा 25 मिनिटे वेळ वाचणार आहे.
हा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 

Web Title :- Mumbai-Pune Expressway | Mumbai will be closer to Pune which is exactly what will happen because of which 25 minutes of passenger time will be saved Find out

 

हे देखील वाचा :

UPSC 2021 Results Ranking | यूपीएससीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली, पहिल्या 5 मध्ये 4 मुली

Aloe Vera Benefits For Diabetes | मधुमेहात कोरफड गुणकारी? जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

Skin Care Tips | अचानक आलेल्या पिंपल्समुळं झालेत हैराण? करा ‘हे’ घरगुती उपयुक्त उपाय…

 

Related Posts