IMPIMP

Nanded Crime | जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण ! नायब तहसीलदारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन Nanded Crime | हदगाव तालुक्यातील (Hadgaon) तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर (Nanded Crime) आला आहे. येथील सरकारी जमिनीवर गेलेल्या महसूल प्रशासनाने शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून तामसा पोलीस ठाण्यात (Tamsa Police Station) बुधवारी (17 नोव्हेंबर) रोजी हदगाव महसूल विभागाच्या नायब तहसीलदारासह 6 जणांविरुद्ध चौकशीअंती अट्रासिटीचा (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या तक्रारीनुसार सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपावरून चौघाविरुद्ध गुन्हा नोंद झालाय.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी, तामसा शिवारातील जांभळा रोडवर असलेल्या शासन शेत गट नंबर 486 या शेतावर 11 नोव्हेंबर रोजी महसूल विभागाचे नायब
तहसीलदार गोपाळ हराळे (Gopal Harale), तामसा मंडळ अधिकारी संजय बिऱ्हाडे (Sanjay Birhade), तलाठी रुपेश जाधव (Rupesh Jadhav)
यांच्यासह लोकप्रतिनिधी, निवृत्त शिक्षक यांनी शेतात काम करीत असलेल्या फिर्यादी हिरकणबाई अशोक राठोड (Hirkanbai Ashok Rathod) व तिचे
पती अशोक पांडुरंग राठोड (Ashok Pandurang Rathod) यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली आहे. पोलीस प्रशासनाकडून 5
दिवसाच्या चौकशीनंतर अट्रासिटी कायदानुसार गुन्हा (Nanded Crime) दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तामसा महसूलचे मंडळ अधिकारी संजय बिऱ्हाडे (Sanjay Birhade) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक पांडुरंग राठोड व इतर अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी जी. जी. रांजणकर (DYSP G. G. Ranjankar) हे सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे (API Ashok Ujjare), पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले (PSI Balaji Kirwale) यांच्या मदतीने पुढील तपास करत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title :- Nanded Crime | Beaten up by racists! Case filed against 6 persons including nayab tehsildar-Tamsa Police Station case

 

हे देखील वाचा :

Vikram Gokhale | ‘त्या’वरून विक्रम गोखले संतापले; म्हणाले – ‘त्याबद्दल आपल्याला शरम वाटत नाही का?’

Vikram Gokhale | ‘2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं मत मी बदलणार नाही’ – विक्रम गोखले

High Court | दोन धर्माच्या प्रौढ जोडप्याच्या वैवाहिक जीवनात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही – हायकोर्ट

 

Related Posts