IMPIMP

Nandurbar Police | महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला ‘कोरोना’ योध्यांचा सत्कार

by nagesh
Nandurbar Police | Women Corona warriors from Nandurbar District Police Force and Health Department felicitated on the occasion of International Women s Day

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइनNandurbar Police | भारतीय समाज हा सुरुवातीपासुनच पुरुष प्रधान समाज राहिलेला आहे. स्त्रीला फक्त चुल आणि मुल याच दृष्टीकोनातुन बघितले जात होते. मात्र आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला पहायला मिळतात. आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही, असे प्रतिपादन नंदुरबार प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी मिनल करनवाल (Minal Karanwal) यांनी केले. महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस (Nandurbar Police) दलातील व आरोग्य विभागातील (Health Department) महिला कोरोना योध्यांचा (Female Corona Warriors) सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

या कार्यक्रमाला नंदुरबार पोलीस (Nandurbar Police) अधीक्षक पी. आर. पाटील (SP P.R. Patil) व त्यांच्या पत्नी रचना पाटील (Rachna Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar), उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार (Deputy Chief Executive Officer Zilla Parishad Nandurbar) वर्षा फडोळ (Varsha Fadol), उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray), अतिरिक्त अधीक्षक अभियंता कोठारे (Additional Superintendent Engineer Kothare), पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा आत्माराम प्रधान (Deputy Superintendent of Police Crime Branch Atmaram Pradhan) यांच्यासह नंदुरबार पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त (International World Women’s Day) देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक पी. आर पाटील (Superintendent of Police P.R. Patil) यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील (Nandurbar Police) महिला पोलीस अधिकारी, महिला अंमलदार, आरोग्य विभागातील महिला अधिकारी व आशा वर्कर (Asha Worker) यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी नंदुरबार मिनल करनवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

मिनल करनवाल म्हणाल्या, आजची महिला एस. टी. बसची चालक (S.T. Bus Driver) ते नासा (NASA) ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन (International Research) क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे.
आजची स्त्री पुरुषांप्रमाणेच आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यात सक्षम बनलेली आहे.
विवाह झालेली स्त्री सासर व आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून तिने निवडलेल्या क्षेत्रात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.
पोलीस दलात महिला पोलिसांचे प्रमाण ही लक्षणीय आहे.
पोलीस दलात पोलीस शिपाई ते अनेक मोठ्या पदांवर महिला आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

संपूर्ण जगभरासह भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. केंद्र (Central Government) व राज्य सरकारने (State Government) संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत केले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने वर्क फ्रॉम होम (Work from home) ही संकल्पना राबवली होती.
मात्र, अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले होते.
समाजाच्या संरक्षणाची व आरोग्याची जबाबदारी घेतलेल्या पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग अहोरात्र मेहनत घेऊन Front Line Worker म्हणून आपले कर्तव्य बजावत होते.
या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कोरोना माहामारीतील कर्तव्यामुळे कोरोना योद्धा म्हणून संबोधले गेले.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार पोलीस दलाने पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी,
कर्मचारी यांनी कोरोनावर मात करुन पुन्हा कर्तव्यावर हजर झाले अशा कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये नंदुरबार पोलीस दलातील 31 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार, 23 वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका,
आशा गटप्रवर्तक, शहादा तालुक्यातील 14 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका,
आशा गटप्रवर्तक तळोदा तालुक्यातील 12 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका,
अशा गटप्रवर्तक जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील 51 महिला अशा एकूण 119 अधिकारी
व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

Web Title :- Nandurbar Police | Women Corona warriors from Nandurbar District Police Force and Health Department felicitated on the occasion of International Women s Day

 

हे देखील वाचा :

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं अत्यंत छोटे कपडे घालून शेअर केला फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाली – ‘जास्त गर्मी इथे आहे.

Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांना टोलमाफी बंद

Diabetes | केवळ 3 तासात डायबिटीज रूग्णांची ब्लड शुगर कंट्रोल करेल ‘हा’ ज्यूस, एक्सपर्टचा दावा

 

Related Posts