IMPIMP

Narayan Rane | शिवसेना-सरवणकर वादात नारायण राणेंची एन्ट्री ! सरवणकरांच्या घरातून उद्धव ठाकरेंना दिला इशारा, म्हणाले – ‘मुंबई आणि महाराष्ट्रात…’

by nagesh
Narayan Rane | narayan rane to appear in alibag court case about objectionable words against ex cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) आणि शिवसेनेच्या (Shivsena) वादात आता भाजपचे (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली आहे. नारायण राणे यांनी आज आमदार सदा सरवणकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मुंबईतील प्रभादेवी (Prabhadevi) येथे झालेल्या राड्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) हे आज दुपारी बाराच्या सुमारास सरवणकर यांच्या घरी पोहचले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) थेट निशाणा साधत इशारा दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले नारायण राणे?

 

सदा सरणवकर यांच्या भेटीनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत. काल जो प्रकार घडला, त्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या हेतूने आलो. आमची युती (Alliance) आहे. एकमेकांना मदत करणं हा युतीधर्म आहे. त्या पार्श्वभूमीवर मी विचारपूस करण्यासाठी आलो आहे. तक्रार दिलीय त्याची पोलीस चौकशी (Mumbai Police) करतील. फायरिंग (Firing) झालंय असं म्हणता, तर आवाज आला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

 

उद्धव ठाकरेंना इशारा

 

मातोश्रीच्या (Matoshree) दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही.
पण असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात (Maharashtra) राहयचंय फिरायचं ना? परवानगी घ्यावी लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.
तसेच पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलोय, असेही राणे म्हणाले.

 

 

काय आहे प्रकरण?

गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना व शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता.
प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना (Shiv Sainik) शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. मात्र शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला.
सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली.
यानंतर शिंदे गटाचे आमदार सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant)
यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलाचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.
त्यानंतर सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane meets sada sarvankar narayan rane jump in shiv sena sada saravankar dispute

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील चुहा गँगच्या प्रमुखासह साथिदारांवर मोक्का कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 94 वी कारवाई

7th Pay Commission | नवरात्रीत होऊ शकते DA वाढवण्याची घोषणा! मग किती वाढणार पगार? जाणून घ्या

Post Office | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, 100 रुपयांपासून करा सुरुवात, असे मिळतील 16 लाख

Cholesterol Control Tips | दूध प्यायल्याने ट्रायग्लिसराईड वाढते का, Cholesterol च्या रूग्णांनी जाणून घ्यावे

 

Related Posts