IMPIMP

Pune Crime | पुण्यातील चुहा गँगच्या प्रमुखासह साथिदारांवर मोक्का कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 94 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशान्वये शहरातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत चूहा गँग टोळीप्रमुखासह (Chuha Gang) दोन साथिदारंवर मोक्का कारवाई (MCOCA Action) MCOCA केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 94 आणि चालु वर्षात 31 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चुहा गँगचा प्रमुख इस्माईल मौलाली मकानदार Ismail Moulali Makanadar (वय-26 रा. नबी अण्णा चाळ, संतोषनगर, कात्रज-Katraj) याच्यासह टोळी सदस्य जावेद मेहबुब मुल्ला Javed Mehbub Mulla (वय-27 रा. गल्ली नं.3, संतोषनगर, कात्रज), तौसिफ उर्फ मोसिन उर्फ चूहा जमीर सैय्यद Tausif alias Mosin alias Chuha Zameer Syed(वय-28 रा. संतोषनगर, कात्रज) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

सराईत गुन्हेगार ईस्माईल मकानदार याने प्रत्येक गुन्ह्याच्यावेळी दोन साथिदारांच्या मदतीने परिसरात दहशत माजवली होती. आरोपींनी टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), खंडणी (Extortion), विनापरवाना शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे यासारखे गंभीर गुन्हे (Crime) वारंवार केले आहेत. टोळी प्रमुखावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) तसेच तडीपार करण्यात आले होते. मात्र त्याच्यात काहीच सुधारणा झाली नाही.

 

चुहा गँगविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती
विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
अपर पोलीस आयुक्तांनी 5 सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आहे.
पुढील तपास स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale,
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण
(ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर
(Senior Police Inspector Jagannath Kalaskar), सर्विलन्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव गायकवाड
(PSI Vaibhav Gaikwad), अंमलदार चंद्रकांत माने, महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | MCOCA action against associates including head of Chuha gang in Pune; Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 94th action till date

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | नवरात्रीत होऊ शकते DA वाढवण्याची घोषणा! मग किती वाढणार पगार? जाणून घ्या

Post Office | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, 100 रुपयांपासून करा सुरुवात, असे मिळतील 16 लाख

Cholesterol Control Tips | दूध प्यायल्याने ट्रायग्लिसराईड वाढते का, Cholesterol च्या रूग्णांनी जाणून घ्यावे

 

Related Posts