IMPIMP

Post Office | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, 100 रुपयांपासून करा सुरुवात, असे मिळतील 16 लाख

by nagesh
Post Office | post office recurring deposit scheme invest and get 16 lakhs rupees after maturity

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस (Post Office) स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. म्युच्युअल फंडाच्या (Mutual Fund) जमान्यात पोस्ट ऑफिसची एक योजना चांगला रिटर्न देत आहे. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवते. यापैकी एक पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम (Post Office Recurring Deposit) आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची आहे, परंतु या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. तुम्ही या योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

दर 3 महिन्यांनी मिळते व्याज

 

रिकरिंग डिपॉझिट ही पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते. सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये, गुंतवलेल्या रकमेवर दर तीन महिन्यांनी व्याज जमा केले जाते. दर तीन महिन्यांच्या शेवटी, चक्रवाढ व्याजासह व्याजाची रक्कम खात्यात जमा होते. (Post Office)

 

 

किती आहे व्याजदर

 

सध्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर 5.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. केंद्र सरकार दर तिमाहीत आपल्या बचत योजनेचे व्याजदर निश्चित करते. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कोणीही ही योजना उघडू शकतो. योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास, मोठी रक्कम उभारू शकता.

 

 

कर्जाची सुविधा उपलब्ध

 

18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती रिकरिंग डिपॉझिट योजनेत खाते उघडू शकते. पालकही त्यांच्या अल्पवयीन मुलासाठी खाते उघडू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. या योजनेत 12 हप्ते जमा केले तर बँकांकडून कर्ज मिळू शकते. खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कसे मिळतील 16 लाख?

 

जर रिकरिंग डिपॉझिट योजनेत दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर 16 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळतील. जर दरमहा 10,000 रुपये जमा केले तर एका वर्षात 1 लाख 20 हजार रुपये जमा होतील.

या योजनेत 10 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. अशा प्रकारे 12,00,000 रुपये गुंतवणूक म्हणून जमा कराल.
यानंतर, योजनेच्या मुदतीनंतर, रिटर्न म्हणून 4,26,476 रुपये मिळतील.
अशा प्रकारे 10 वर्षांनंतर एकूण 16,26,476 रुपये मिळतील.
अशा प्रकारे रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांची गुंतवणूक करू शकता.

 

 

Web Title :- Post Office | post office recurring deposit scheme invest and get 16 lakhs rupees after maturity

 

हे देखील वाचा :

Cholesterol Control Tips | दूध प्यायल्याने ट्रायग्लिसराईड वाढते का, Cholesterol च्या रूग्णांनी जाणून घ्यावे

Union Minister Nitin Gadkari | “मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणेच काम करेन”, नितीन गडकरींनी केले स्पष्ट

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन मित्रावर कोयत्याने वार, पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील घटना

 

Related Posts