IMPIMP

Pune Purandar Airport | पुरंदर विमानतळग्रस्तांसाठी मोबदल्याचे पर्याय लवकरच निश्चित; भूसंपादन प्रक्रियेच्या आदेशांची प्रतिक्षा

by nagesh
Pune-Purandar Airport | Land acquisition of Purandar Airport as per MIDC Act

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Purandar Airport | पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी मोबदल्याचे पर्याय जिल्हा प्रशासनाकडून लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) जुन्या जागेवरच विमानतळ प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. जिल्हा प्रशासनाला केवळ भूसंपादन अधिसूचना काढण्याची प्रतिक्षा आहे. प्रत्यक्ष भूसंपादन (Land Acquisition) सुरू करण्यापुर्वी देण्यात येणाऱ्या मोबदल्याचे पर्याय निश्‍चित करण्यात येणार आहेत. (Pune Purandar Airport)

 

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्वीच्या जागी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता भूसंपादन आणि मोबदल्याचे पर्याय निश्‍चित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावांतील जमीन विमानतळासाठी निश्‍चित करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) या जागेत बदल प्रस्तावित केला होता. मात्र, नव्या जागेला संरक्षण मंत्रालयाकडून नकार देण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यानंतर जुन्या जागेवरच विमानतळ प्रकल्प करण्याचे निश्चित झाले आहे. सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये यापूर्वी निश्‍चित केलेल्या जागेवरच विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Pune Purandar Airport)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी विमानतळ प्रकल्प जुन्याच जागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सासवड येथील जाहीर मेळाव्यातही याबाबत सुतोवाच केले. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्पाबाबत काहीही प्रगती झालेली नाही. स्थानिक प्रशासकीय पातळीवर जमीन मोजणी, कागदपत्रांची पाहणी किंवा त्यासंबंधी करण्यात येणारी कामे बंद करण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) भूसंपादनाबाबत लागणारी कागदोपत्री प्रक्रियांचे काम देखील पूर्णतः बंद करण्यात आले आहे. हे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही एमएडीसीकडून सांगण्यात आले.

 

राज्य सरकारकडून आदेश मिळताच कार्यवाही
पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील २८३२ हेक्‍टर जागेची आवश्‍यकता आहे.
केंद्र शासनाच्या संरक्षण, भारतीय हवाई दल, वन अशा अनेक विभागांच्या परवानग्या घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता भूसंपादन अधिसूचना आणि मोबदल्याचे पर्याय निश्चित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल,
असे जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी सांगण्यात आले. राज्य सरकारकडून आदेश प्राप्त झाल्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune Purandar Airport | Compensation options for Purandar airport sufferers set soon; Awaiting orders for land acquisition process

 

हे देखील वाचा :

AAP Leader Vijay Kumbhar | दिल्लीच्या अबकारी धोरणाबाबत अण्णांचे पत्र हे दुर्दैवी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे – विजय कुंभार

Pune Pimpri Crime | तडीपारीचा खर्च म्हणून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करत मागितली खंडणी

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला; म्हणाल्या – ‘तुम्ही सोडून गेलात हाच मोठा गौप्यस्फोट, आता…’

 

Related Posts